Janardhan Mishra Dainik Gomantak
देश

Video: Gloves न घालता BJP खासदाराने साफ केले टॉयलेट

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील भाजप खासदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील भाजप खासदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाळेतील शौचालयाची स्वच्छता करताना खासदार महोदय दिसत आहेत. जनार्दन मिश्रा असे या खासदाराचे नाव आहे. व्हिडिओमध्ये खासदार जनार्दन मिश्रा हे ग्लब्स न घालता शाळेतील टॉयलेट साफ करताना दिसत आहेत.

दरम्यान, शाळेतील स्वच्छतागृह स्वच्छ करण्याबाबत खासदार महोदयांनी एक ट्विटही केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'पक्षातर्फे चालवल्या जात असलेल्या सेवा पखवाडा अंतर्गत युवा मोर्चाने कन्या शाळा खातखरी येथे वृक्षारोपण कार्यक्रमानंतर शाळेतील (School) स्वच्छतागृहांची स्वच्छता केली.'

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या वाढदिवसापासून (17 सप्टेंबर) भाजप युवा मोर्चाने राज्यात स्वच्छता मोहीम राबवली आहे, जी 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खासदार मिश्रा या शाळेत पोहोचले होते.

तसेच, शाळेत पोहोचल्यानंतरच रीवाचे खासदार मिश्रा यांच्या लक्षात आले की, शाळेतील स्वच्छतागृहे अतिशय अस्वच्छ आहेत. त्यानंतर त्यांनी स्वतः स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यास सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, 'आपल्या सभोवतालची स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. महात्मा गांधींप्रमाणेच (Mahatma Gandhi) पंतप्रधान मोदींनाही हा संदेश घरोघरी पोहोचवायचा आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: गोव्‍यात काम देण्‍याच्‍या बहाण्‍याने युवतींची फसवणूक! महाराष्‍ट्रातील मुलीही विळख्‍यात; नेपाळ, केनिया, युगांडाच्‍या तरुणींना आमिष

Panaji: पणजीला जुगार, ड्रग्ज, वेश्याव्यवसायाचा विळखा! LOP युरींनी वाचला सरकारच्या अपयशाचा पाढा

Goa Theft: रात्री दुकान फोडून घुसले चोरटे, हाती लागली फक्त चिल्लर, कोल्ड्रिंक पिऊन पळाले; पेडण्यात चोरांची झाली फजिती

Goa Tourism: 350 कोटींचे नवे प्रकल्‍प, पर्यटक वाढ; रशियातून विमान; पर्यटनमंत्री खंवटेंनी मांडला लेखाजोखा

Rashi Bhavishya 30 July 2025: प्रवासाची शक्यता,आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या; फसवणुकीपासून सावध राहा

SCROLL FOR NEXT