Bjp Manifesto  Dainik Gomantak
देश

BJP Manifesto News : भाजपच्या ‘संकल्पपत्रा’तून मोदींची विकासाची गॅरंटी

BJP Manifesto News : जाहीरनामा प्रसिद्ध; गरीब, युवक, शेतकरी, महिला केंद्रस्थानी

गोमन्तक डिजिटल टीम

BJP Manifesto News :

नवी दिल्ली, केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास समान नागरी कायदा लागू करण्याचे आणि ‘एक देश, एक निवडणूक’ प्रणाली अंमलात आणण्याचे आश्‍वासन भाजपने आज देशवासीयांना दिले.

देशातील प्रमुख चार वर्गांना केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या जाहीरनाम्याचे, ज्याला त्यांनी ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे, प्रकाशन केले. विकास आणि परंपरा या दोन्ही बाबींवर विश्‍वास ठेवून भारताला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर नेऊ, असा विश्‍वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. इतर महत्त्वाच्या पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले असल्याने भाजपच्या जाहीरनाम्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दीनदयाळ मार्गावरील भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज ‘संकल्पपत्रा’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जाहीरनामा समितीचे अध्यक्ष व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते.

‘मोदींची गॅरंटी २०२४’

गरीब, युवक, अन्नदाता आणि नारीशक्ती या घटकांना केंद्रीभूत ठेवून भाजपने जाहीरनामा तयार केला आहे. ‘मोदींची गॅरंटी २०२४’ असे शीर्षक दिले आहे. सध्या राबविल्या जात असलेल्या विविध योजना पुढील काळातही राबविण्यात येतील, असे पंतप्रधान मोदी यांनी भाषणात सांगितले.

सध्या जगात अनिश्चिततेचे वातावरण आहे. अस्थिर देशांत राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षा आमची प्राथमिकता आहे. अशावेळी ठोस निर्णय घेण्यासाठी मजबूत आणि स्थिर सरकार केंद्रात असणे आवश्यक आहे. एक असे सरकार असणे गरजेचे आहे की जे देशाला आर्थिक रूपाने समृद्ध बनवेल.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

हे जुमलापत्र आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात महागाई आणि बेरोजगारी हे शब्दच नाहीत. लोकांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास भाजप तयार नाही, हेच यातून सिद्ध होते.

- राहुल गांधी, काँग्रेसचे नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK vs SL: पाकिस्तानची पुन्हा लाज गेली! 6 चेंडूत 10 धावा जमल्या नाही, श्रीलंकेसमोर टेकले गुडघे Watch Video

Cash For Job: नोकरीसाठी पैसा दिला, तरी ‘इतका आला कुठून?’ असे विचारत ED मागे लागते; पैसे देऊन अवलक्षण

अग्रलेख: गोव्यात 'दरोडा' घालायचा विचार जरी मनात आला, तरी कापरे भरेल अशी जरब व भीती बसणे शक्य आहे..

IFFI 2025: 'जागतिक सिनेमा गोव्‍यात अनुभवता यावा, हेच आमचे प्रथम लक्ष्‍य’! NFDCचे तांत्रिक विभागप्रमुख यादव यांचे स्पष्टीकरण

Illegal Fishing: भाजप आमदाराच्या मालकीचा ट्रॉलर जप्त? महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी! अधिकाऱ्यांकडून मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT