Goa Murder Case: क्रूर घटनेने गोवा हादरला; साडेपाच वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या

Goa Murder Case: २० संशयितांना चौकशीसाठी घेतले ताब्यात; बलात्कार आणि अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी वीस संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Five year old girl gangraped and killed in Vasco Goa

दाबोळी-वाडे येथे एका निर्माणाधीन इमारतीत संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळलेल्या साडेपाच वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला तोंड दाबून ठार मारल्याची क्रूर घटना घडल्याची माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक (South Goa SP) सुनीता सावंत यांनी आज दिली.

बलात्कार आणि अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी वीस संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि खुनाचा (Rape And Murder) गुन्हा नोंद केला आहे.

शुक्रवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी पत्रकारांना सांगितले की, याप्रकरणी वास्को पोलिसांनी सुरवातीला अनैसर्गिक मृत्यू म्हणून गुन्हा नोंद केला होता; परंतु शवचिकित्सेनंतर या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिचे तोंड दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार तसेच खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

Goa Crime News
Goa Cashew Rates: काजूला 175 रु. भाव ही काँग्रेसचीच मागणी : एल्टन डिकॉस्टा

या प्रकरणाचा पोलिस लवकरच सोक्षमोक्ष लावतील. यावेळी वास्को पोलिस स्थानकात पोलिस अधीक्षक सुनीता सावंत, पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकारी होते. वास्कोचे पोलिस निरीक्षक कपिल नायक याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

वास्को पोलिसांनी उपजिल्हा इस्पितळात धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. तसेच ज्या ठिकाणी मुलीचा मृत्यू झाला, त्या ठिकाणाचीही तपासणी केली. मुरगाव तालुका पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई, वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी वाडे येथे त्या नवीन इमारत बांधकाम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन तपासणी केली. तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.

बलात्कार आणि हत्याप्रकरणी वास्को पोलिसांनी (Vasco Police) भादंसं कलम ३०२, ३७६ तसेच पॉस्को, गोवा बाल कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अन् पित्याला मुलगी दिसलीच नाही

मुलीचा पिता याच इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. शुक्रवारी (ता.१२) पहाटे ३ वाजता तो त्याच्या तेथील खोलीवर आला असता, त्याला घरात मुलगी आढळली नाही.

त्याने त्याबाबत पत्नीकडे विचारणा केली आणि शोधाशोध केली असता, इमारतीत एका जागी ती मुलगी बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. तिला चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

मातेच्या दाव्यानुसार पोलिस तपास

आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती पीडितेच्या मातेने दिली होती. या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी आपल्या हाती घेतली आहेत. पोलिसांनी मृत मुलीच्या आई-वडिलांची जबानी घेतली असून त्यानुसार अधिक तपास सुरू आहे. तसेच इमारतीचे बांधकाम करणाऱ्या इतर कामगारांचीही पोलिस चौकशी केली जात आहे.

ठसेतज्ज्ञांमार्फत तपासणी :

घटनास्थळी ठसेतज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. शवचिकित्सेत त्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. त्या अल्पवयीन मुलीवर प्रथम सामूहिक बलात्कार करून तिची तोंड दाबून हत्या केल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी पत्रकारांना शुक्रवारी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com