Cabinet Expansion Dainik Gomantak
देश

मंत्रीपद गेल्यामुळे भाजप नेते नाराज; सोशल मिडीयावर व्यक्त केल्या भावना

पश्चिम बंगालमधील भाजपचा मोठा चेहरा समजल्या जाणार्‍या बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचे समजतो आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: मोदींच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला आहे. पीएम मोदींनी मंत्रीमंडळात एकूण 43 नवीन चेहर्‍यांचा समावेश केला आहे. वेगवेगळ्या राज्यातून येणाऱ्या या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहेत. अनेकांनी आजपासून आपले काम देखील सुरू केले आहे. या दरम्यान पश्चिम बंगालमधील भाजपचा मोठा चेहरा समजल्या जाणार्‍या बाबुल सुप्रियो यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचे समजतो आहे. सोशल मीडियावरही त्यांनी तशी एक पोस्ट देखील शेअर केली आहे. (BJP leaders were upset after the Union Minister had to leave)

बाबुल सुप्रीयोन यांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना, “आपल्याला राजीनामा देण्यास सांगण्यात आले त्यामुळे आपण राजीनामा दिला. मात्र नंतर ती पोस्ट हटवल्यानंतर बाबुल यांनी पुन्हा एक पोस्ट शेअर करत लिहिले की, कोठेतरी आग लागली तरच धूर येतो. आज मी माझ्या माध्यमांमधील मित्रांचे फोन सुद्धा घेऊ शकलो नाही. विचार केला की, स्वतःच हे जाहीर कराव कि मी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे ... (मी पूर्वी सांगितले होते की मला राजीनामा देण्यास सांगितले गेले होते, मात्र हे सांगण्याचा तो योग्य मार्ग नव्हता)

पुढे त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. “पंतप्रधानांच्या मंत्री मंडळाचे सदस्य म्हणून मला देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला फार आनंद होत आहे की, आजपर्यंत मी भ्रष्टाचाराची डाग न लागु देता माझ्या मतदारसंघातील जनतेची पूर्ण ताकदीने सेवा केली आहे. बाबुल यांनी पुढे असे लिहिले की बंगालमधून ज्यांना मंत्रीपद मिळाले त्यांना शुभेच्छा. मी नक्कीच माझ्यासाठी दु: खी आहे, परंतु त्यांच्यासाठी आनंदी आहे.

दरम्यान, यामुळे असे स्पष्ट होत आहे की, भारतीय जनता पक्षांच्या केंद्रीय नेत्यांमध्ये मंत्रीपद सोडावे लागल्यामुळे नाराजी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'बर्च' घटना अपघात म्हणून सोडून द्यावी? 25 जण जिवंत जळाले तरी सरकार गप्प का? युरी आलेमाव यांचा सवाल

Chimbel Unity Mall: चिंबल 'युनिटी मॉल'चा फैसला 14 तारखेला! सत्र न्यायालयात 'जीटीडीसी' आणि याचिकाकर्त्यांमध्ये जोरदार युक्तिवाद

Kushavati District: 'कुशावती' जिल्ह्यामध्ये काणकोणचा समावेश नको, ...अन्यथा तीव्र आंदोलन; श्रीस्थळ येथील बैठकीत ठराव

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

SCROLL FOR NEXT