कर्नाटकात (Karnataka) पुन्हा अनलॉक (Unlocked) प्रक्रिया सुरु झाल्यानंतरही नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distance) पालन, मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा राज्यात 15 दिवसानंतर पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) करण्याची स्थिती निर्माण होईल, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा (Chief Minister Yeddyurappa) यांनी दिली आहे. बुधवारी मुख्यमंत्री दोबळ्ळापूर येथील रुग्णालयाच्या लोकार्पणावेळी ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले, देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी युध्दपातळीवर आरोग्य सुविधांची पूर्तता करण्यात येत आहे.
देशात पहिल्यांदा मेक शिप्ट रुग्णालय तयार करण्यात आलं असून येथे 70 खाटांची व्यवस्था आहे. यामध्ये खासगी संस्थांनी मोलाचे सहकार्य केले आहे. कोरोना काळात नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे या मेक शिप्ट रुग्णालयाचा वापर केवळ कोरोना काळातच नव्हे तर इतर वेळही करता येतो. सरकारकडून कोरोनावर नियंत्रणासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येत आहेत. आपण सर्व मिळून देशात येऊ घातलेली कोरोनाची तिसरी लाट थोपवू शकते. राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली असता नागरिकांनी मात्र कोणत्याही परिस्थिती गाफील राहू नये. अन्यथा 15 दिवसानंतर राज्यात लॉकडाऊन लरावण्याची स्थीती उद्भवेल, असा इशारा मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.