West Bengal Dainik Gomantak
देश

West Bengal: भर रस्त्यात भाजप नेत्यावर बेछुट गोळीबार करुन हत्या, बंगाल पोलीसांचा तपास सुरु

भाजप नेते राजू झा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालच्या पूरबा वर्धमान जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी भाजप नेते राजू झा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राजू झा हे कोलकात्याला जात असताना शक्तीगढ पोलीस ठाण्यात हद्दीत काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला.

या हल्ल्यात राजू झा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीसांचा तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू झा वर्धमानहून कोलकाता येथे जात असताना शक्तीगड येथील मिठाईच्या दुकानाबाहेर काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. राजू झा यांच्या बरोबर तीन जण कारने प्रवास करत होते.

राजू झा यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळुन गेले. या हल्ल्यामागचा हेतू अद्याप समजू शकला नाही. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले राजू झा यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. पण रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर, इतर जखमींना रुग्णालयात दाखल करून घेतले. डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजू झा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT