Nalanda Violence: नालंदामध्ये पुन्हा गोळीबार, दोन गटात हाणामारी; तीन जण जखमी

Nalanda Violence: नालंदाच्या पहारपुरा येथे झालेल्या या गोळीबारात तीन जण जखमी झाले आहेत. या हिंसाचारात कुणाच्या जबड्याला तर कुणाच्या हाताला गोळी लागली.
Nalanda Violence
Nalanda ViolenceTwitter / ANI
Published on
Updated on

Nalanda Violence: बिहारमधील नालंदा येथील हिंसाचार शांत होण्याचे नाव घेत नाहीये. येथे सायंकाळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या फ्लॅग मार्चनंतर पुन्हा दोन गटात गोळीबार झाला.

नालंदाच्या पहारपुरा येथे झालेल्या या गोळीबारात तीन जण जखमी झाले आहेत. या हिंसाचारात कुणाच्या जबड्याला तर कुणाच्या हाताला गोळी लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.

प्रकरणाचे गांभीर्य पाहून प्रशासनाचे पथक नालंदाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावर लक्ष ठेवून आहे आणि फ्लॅग मार्च काढत आहे.

नालंदा हा नितीश कुमार यांचा होम जिल्हा

मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही बातमी समोर येत आहे. वास्तविक नालंदा हा मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा गृह जिल्हा आहे.

शुक्रवारीही रामनवमी यात्रेदरम्यान याठिकाणी गोंधळ, हाणामारी, गोळीबार, तोडफोड, जाळपोळ असे प्रकार घडले.

शुक्रवारी घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पहारपुरमध्ये शनिवारी पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला.

यावेळी अनेक राऊंड गोळीबार करण्यात आला. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Nalanda Violence
Rahul Gandhi: राहुल गांधींना आणखी एक झटका, 'या' राज्यात मानहानीचा गुन्हा दाखल

शुक्रवारीही हिंसाचार झाला होता

नालंदा येथील लाहेरी पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील गगन दिवाणजवळ शुक्रवारी रामनवमीच्या मिरवणुकीनंतर दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत 14 जण जखमी झाले, त्यातील 4 जणांना गोळ्या लागल्या होत्या, त्यापैकी 3 जणांना पाटणा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.

Nalanda Violence
Bihar: अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी बिहारमध्ये तणाव, अनेक ठिकाणी जाळपोळ; Video

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. यासंदर्भात नालंदा जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी शशांक शुभंकर म्हणाले की, आम्ही सीसीटीव्ही फुटेज, ड्रोन कॅमेरा आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून घटनेची माहिती घेत आहोत.

पुराव्याच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जाईल. त्यांना सोडले जाणार नाही, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com