PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींना विष्णूंचा अवतार का म्हटले, याचे स्पष्टीकरण देताना पुरोहित यांनी त्यांची कार्यपद्धती आणि जीवनशैलीचा उल्लेख केला.

Manish Jadhav

भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते राज पुरोहित यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भगवान विष्णूशी (Lord Vishnu) तुलना करत, त्यांना विष्णूंचा 11वा अवतार (11th Incarnation) म्हटले. दुसरीकडे मात्र, त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली. पुरोहित यांनी आपल्या वक्तव्यामागील कारणही स्पष्ट केले.

राज पुरोहित यांच्या विधानामागची भूमिका

राज पुरोहित म्हणाले की, "लोकशाहीमध्ये (Democracy) प्रत्येकावर टीका-टिप्पणी होतेच. पण मला जे वाटते, ते व्यक्त करण्याचा मला अधिकार आहे." ते पुढे म्हणाले, "जर एखादी व्यक्ती मला सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) किंवा महात्मा गांधींसारखी (Mahatma Gandhi) वाटली, तर मी तसे म्हणतो."

पंतप्रधान मोदींना विष्णूंचा अवतार का म्हटले, याचे स्पष्टीकरण देताना पुरोहित यांनी त्यांची कार्यपद्धती आणि जीवनशैलीचा उल्लेख केला. ते म्हणाले, "जेव्हा मी पंतप्रधान मोदींचे काम पाहतो. त्यांना त्यांच्या मातोश्रींची सेवा करताना पाहतो, भारत मातेची सेवा करताना पाहतो. त्यांची जागतिक स्तरावरील प्रतिमा पाहतो. त्यांना न थांबता, न थकता, न झुकता काम करताना पाहतो. जगात ते जिथेही जातात, मुस्लिम देश असो वा ख्रिश्चन देश, त्यांना सर्वोच्च पुरस्काराने (Highest Award) सन्मानित केले जाते."

पंतप्रधानांना 'देवाचा अवतार' का म्हटले?

भाजप नेत्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान मोदी जे कोणतेही काम हाती घेतात, ते पूर्ण करतात. "11 वर्षांपूर्वी देशाची काय परिस्थिती होती? आज रेल्वे असो, रस्ते असोत किंवा भारताचे कोणतेही क्षेत्र असो, नरेंद्र मोदींचा प्रभाव दिसत नाही असे नाही," असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, "नरेंद्र मोदी हे गरिबांचे (Poor) प्रमुख सेवक आहेत. ते 24 तास काम करतात. आताच त्यांनी लंडनमध्ये करार केला, त्यानंतर मालदीवला गेले. मी त्यांना पाहतो, तेव्हा मला ते भगवान विष्णूंचा अवतार दिसतात."

पुरोहित यांच्या मते, पंतप्रधान मोदींना पाहून त्यांना देवाचे एक रुप दिसते, जे देशाची सेवा करण्यासाठी आणि गरिबांची सेवा करण्यासाठी जन्माला आले आहेत. भारतीय संस्कृतीत (Culture) जो गरिबांची आणि सामान्य व्यक्तींची सेवा करतो, त्याला देवतुल्य मानले जाते, असेही राज पुरोहित यांनी नमूद केले. राज पुरोहित यांच्या या विधानावर आता विरोधी पक्षांकडून काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT