Narendra Modi: 'शपथ घ्या, परदेशी वस्तू खरेदी करणार नाही... तरच यशस्वी होईल ऑपरेशन सिंदूर', PM मोदींचे आवाहन

PM Narendra Modi Speech: भारताला २०४७ पूर्वी जेव्हा स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा भारत एक विकसित राष्ट्र झालेले असेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
PM Narendra Modi Speech
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

गुजरात: "ऑपरेशन सिंदूर यशस्वी करायचे असल्यास यापुढे परदेशी वस्तू खरेदी करणार नाही, अशी शपथ घ्या," असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त भारतीयांना केले आहे. "देशाला वाचविण्यासाठी, देश निर्माणासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी ऑपरेशन सिंदूर ही केवळ सीमेवरील सैनिकांची नाही तर १४० नागरिकांची देखील जबाबदारी आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

"घरात किती विदेशी वस्तू वापरल्या जातात याची यादी तयार करा. हेअरपीन, कंगवा, टूथपेस्ट, पिचकारी यासारख्या अनेक घरातील वस्तू विदेशी आहेत. आम्हाला कल्पना देखील नाही एवढ्या विदेशी वस्तूंनी देशात घुसखोरी केलीय. विदेशी मालाची विक्री करणार नाही, अशी शपथ आपण गावोगावीच्या व्यापाऱ्यांना द्यायला हवी", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Narendra Modi Speech
International Yoga Day: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी योग सक्तीचा; 'फोटो पाठवा, उपस्थिती दाखवा!' गोव्यात नवीन नियम

"देश सशक्त व्हायला हवा, देश सामर्थ्यशाली व्हायला हवा देशातील नागरिक सशक्त व्हायला हवा, यासाठी आम्ही व्होकल फॉर लोकल, एक जिल्हा एक उत्पादन अशा योजना सुरु केल्यात. एक ते दोन टक्के अशा गोष्टी असतील ज्या तुम्हाला बाहेरुन घ्याव्या लागतील. नाहीतर सध्याच्या घडीला असं काहीच नाही जे देशात मिळत नाही," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Narendra Modi Speech
Goa Politics: चिराग नायकांना प्रवेश देऊन काँग्रेसने मारलेला तीर, दिगंबर कामतांना लागणार की नाही?

"ऑपरेशन सिंदूर सैन्यबल नाही तर जनबलाच्या आधारावर जिंकायचे आहे. आणि जनबल मातृभूमीच्या प्रेमातून येते. या देशाच्या मातीचे प्रेम, नागरिकांचा घाम आणि कष्ट असलेल्या गोष्टीचा खरेदी करणार असा संकल्प करुया. आणि भारताला २०४७ पूर्वी जेव्हा स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा भारत एक विकसित राष्ट्र झालेले असेल," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com