Mamata Banerjee Dainik Gomantak
देश

'BJP चे काम फक्त सरकार पाडणे...', मिथुन यांच्या वक्तव्यानंतर ममता बॅनर्जींचा घणाघात

Mamata Banerjee Vs Mithun Chakraborty: भाजप नेते आणि चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या वक्तव्याने पश्चिम बंगालचे राजकारण आणखी तापले आहे.

दैनिक गोमन्तक

Mamata Banerjee Vs Mithun Chakraborty: भाजप नेते आणि चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या वक्तव्याने पश्चिम बंगालचे राजकारण आणखी तापले आहे. ममता सरकारमधील दिग्गज नेते पार्थ चॅटर्जी यांना सध्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केंद्र सरकारला फटकारले. ममता म्हणाल्या की, 'केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने बंगाल तोडणे सोपे नाही.' त्या पुढे म्हणाल्या की, 'लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे पाडण्याशिवाय भाजपकडे दुसरे काय काम उरले आहे'

वास्तविक, भाजप नेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी मीडियासमोर दावा केला की, 'सध्या 39 टीएमसी (TMC) आमदार भाजपच्या (BJP) संपर्कात आहेत. तर 21 आमदार माझ्या थेट संपर्कात आहेत.' मिथुन यांच्या वक्तव्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला. दुसरीकडे, ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टिका केली. ममता म्हणाल्या की, 'केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे उद्दिष्ट केवळ लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या राज्य सरकारांना पाडणे हे आहे.'

"त्यांच्याकडे (BJP) काही काम नाही, तीन-चार एजन्सींच्या माध्यमातून राज्य सरकारे ताब्यात घेणे हे त्यांचे काम आहे. त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र, आता झारखंड काबीज केले, परंतु बंगालने त्यांचा पराभव केला," असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. बंगालला तोडणे सोपे नाही. रॉयल बंगाल टायगरशी त्यांना लढावे लागले." असेही ममता शेवटी म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आखातातील गोवेकरांसाठी सावंत सरकार आलं धावून'' सरदेसाईंच्या धारदार सवालावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

International Women's Day 2026: न्यू यॉर्कमध्ये रंगला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सोहळा, कर्तृत्ववान भारतीय महिलांचा 'गौरव'

Gold Market Value: "युद्धामुळं सोनं झालं पॉवरफुल''! 35 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचलं बाजारमूल्य; भारत आणि ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेलाही सोडलं मागं

Oldest Photograph Of Goa: गोव्यातलं सर्वात जुनं छायाचित्र कोणतं? सोशल मीडियावर रंगली चर्चा; 1855 सालच्या फोटोनं वेधलं लक्ष

VIDEO: "मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका आणि भारताची धाकधूक'' जयशंकर यांनी व्यक्त केली मोठी चिंता; भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

SCROLL FOR NEXT