West Bengal BJP leader Mithun Chakraborty: पश्चिम बंगालचे भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी बुधवारी धक्कादायक दावा केला आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, 'टीएमसीचे 38 आमदार आमच्या संपर्कात आहेत.' मी स्वतः 21 आमदारांशी चर्चा करत असल्याचा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्रात सत्ता बदलू शकते, मग बंगालमध्ये का नाही?
मीडियाशी बोलताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले, 'मी तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज देत आहे. तृणमूलचे 38 आमदार भाजपच्या (BJP) संपर्कात आहेत. त्यापैकी 21 जण माझ्या थेट संपर्कात आहेत. तथापि, मिथुन यांचा दावा खरा मानला तरी, 38 टीएमसी आमदार भाजपमध्ये सामील होऊनही सरकार स्थापन होऊ शकत नाही. राज्यात भाजपचे सध्या 69 आमदार असून आणखी 38 आमदार मिळाल्यानंतर हा आकडा 107 होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.