क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Brendan Taylor breaks Sachin Tendulkar record: झिम्बाब्वेचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज ब्रैंडन टेलरने वनडे क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचला आहे.
Brendan Taylor breaks Sachin Tendulkar record
Brendan Taylor breaks Sachin Tendulkar recordDainik Gomantak
Published on
Updated on

झिम्बाब्वेचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज ब्रैंडन टेलरने वनडे क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात मैदानात उतरताच टेलरने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळ टिकलेला विक्रम आपल्या नावावर केला. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ सक्रिय राहिलेला खेळाडू म्हणून टेलरने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

ब्रैंडन टेलरचे वनडे क्रिकेटमधील करिअर आता २२ वर्षे आणि १४६ दिवसांचे झाले आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला. सचिनने तब्बल २२ वर्षे आणि ९१ दिवस वनडे क्रिकेट खेळले होते. प्रदीर्घ काळ टिकलेला हा विक्रम मोडणे जवळपास अशक्य मानले जात होते. मात्र, टेलरच्या मैदानावरील पुनरागमनामुळे हा विक्रम आता त्याच्या नावावर झाला आहे.

Brendan Taylor breaks Sachin Tendulkar record
Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

या यादीत जयसूर्या तिसऱ्या क्रमांकावर

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ सक्रिय राहिलेल्या खेळाडूंच्या यादीत श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे वनडे करिअर २१ वर्षे आणि १८४ दिवसांचे होते. पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद २० वर्षे आणि २७२ दिवसांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर झिम्बाब्वेचाच सीन विल्यम्स २० वर्षे आणि १८७ दिवसांसह पाचव्या स्थानावर आहे.

पुरुष वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक प्रदीर्घ करिअर

  • ब्रैंडन टेलर – २२ वर्षे १४६ दिवस (झिम्बाब्वे, २००४–२०२६)

  • सचिन तेंडुलकर – २२ वर्षे ९१ दिवस (भारत, १९८९–२०१२)

  • सनथ जयसूर्या – २१ वर्षे १८४ दिवस (श्रीलंका, १९८९–२०११)

  • जावेद मियांदाद – २० वर्षे २७२ दिवस (पाकिस्तान, १९७५–१९९६)

  • सीन विल्यम्स – २० वर्षे १८७ दिवस (झिम्बाब्वे, २००५–२०२५)

२००४ मध्ये केला होता वनडे पदार्पण

ब्रैंडन टेलरने २००४ मध्ये झिम्बाब्वेकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ४० वर्षीय टेलर हा झिम्बाब्वे क्रिकेटमधील महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. देशाकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांमध्येही त्याचे नाव आघाडीवर आहे. मात्र, त्याचे क्रिकेट करिअर अनेक चढ-उतारांनी भरलेले राहिले आहे.

Brendan Taylor breaks Sachin Tendulkar record
Goa Politics: गिरीश चोडणकरांच्या पोस्टवर उत्तराखंड पोलिसांचा डोळा! कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा; पोस्ट हटविण्याची 'एक्स'कडे मागणी

बॅननंतर मैदानावर दमदार पुनरागमन

२०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर टेलरच्या कारकिर्दीला वेगळे वळण मिळाले. २०२२ मध्ये आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर साडेतीन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. बंदीचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्याने २०२५ मध्ये पुन्हा मैदानावर पुनरागमन केले. आता वनडे क्रिकेटमधील प्रदीर्घ कारकिर्दीचा विक्रम आपल्या नावावर करत त्याने पुनरागमन आणखी खास केले आहे.

२०२७ वर्ल्ड कपसाठी टेलरची तयारी

झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया हे देश मिळून २०२७ वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहेत. त्यामुळे आपल्या देशात होणाऱ्या या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचे टेलरचे लक्ष्य आहे. वयाच्या ४०व्या वर्षीही मैदानावर सक्रिय राहून तो या दिशेने प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाकडे झिम्बाब्वेच्या क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष आहे.

१२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वे दौरा

ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल १२ वर्षांनंतर झिम्बाब्वेच्या भूमीवर वनडे सामना खेळण्यासाठी उतरला. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com