BJP national president J P Nadda to visit Uttar Pradesh Dainik Gomantak
देश

UP Election : 'सत्तेसाठी भाजप तत्त्वांशी तडजोड करत नाही, आमच्यासाठी राष्ट्र सर्वोपरि'

आता गरिबांची पोरंही वैद्यकशास्त्र शिकतील; जेपी नड्डा

दैनिक गोमन्तक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यूपीच्या प्रयागराजमध्ये विरोधकांना चांगलेच धारेवर धरले आहे. समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये गुंडांची दहशत होती, पण 2017 मध्ये भाजपचे सरकार येताच गुंड आणि माफिया पळून गेले आहेत. ही निवडणूक (Election) अखिलेश यादव आणि त्यांच्या गुंडांच्या टोळीला दूर करण्यासाठी आहे.

भाजप (BJP) सरकार सुरक्षेसह विकासाचे मॉडेल पुढे नेत आहे. बारावीनंतर शिकणाऱ्या मुलींना आम्ही स्कूटी देऊ आणि तरुणांना लॅपटॉप देऊ, असा निर्णय घेतला आहे, जेणेकरून तरुणांना शिक्षणाशी जोडून घेता येईल. यासोबतच 7 लाख नोकऱ्याही दिल्या जाणार आहेत.

जेपी नड्डा म्हणाले की, राहुल गांधी, अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी यांचा जन्म चांदीचा चमचा घेऊन झाला आहे. ते जन धन योजनेची खिल्ली उडवायचे, कारण त्यांनी गरिबी कधीच पाहिली नाही. आता मोदीजी शेतकऱ्यांना दरमहा 2000 रुपये देत आहेत. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जात आहेत. एकेकाळी उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) केवळ 15 वैद्यकीय महाविद्यालये होती आणि आज 59 वैद्यकीय महाविद्यालये आहेत. आता गरिबांची पोरंही वैद्यकशास्त्र शिकतील आणि गावात राहून अभ्यास करतील. हा बदलणारा भारत असल्याचे ते म्हणाले.

जेपी नड्डा म्हणाले की, निवडणुकीच्या वेळी इतर राजकीय (Political) पक्ष समाजाचे तुकडे करून सत्ता काबीज करण्याचे काम करतात. मग ते सपा, बसपा किंवा काँग्रेस असो. त्यांनी नेहमीच जाती-धर्माची मदत घेऊन आपली खुर्ची सुरक्षित करण्याचे काम केले आहे. सत्तेसाठी भाजप तत्त्वांशी तडजोड करत नाही. आमच्यासाठी राष्ट्र सर्वोपरि आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI: रोहित शर्मासाठी वेलिंग्टन 'डेंजर झोन', खराब रेकॉर्ड चिंतेचा विषय; दुसऱ्या वनडेत इतिहास बदलण्याचे आव्हान

Andre Russell World Record: टी20 क्रिकेटचा 'बादशाह'! 10,000 धावा आणि 500 विकेट्स घेणारा आंद्रे रसेल ठरला जगातील पहिला खेळाडू; मोडले जुने वर्ल्ड रेकॉर्ड

Shukra Gochar: शुक्राची कृपादृष्टी अन् पैशांचा पाऊस! 6 ते 22 नोव्हेंबरचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार छप्परफाड धनलाभ

Diwali Inflation Report 2026: दूध, तूप, ड्रायफ्रूट्सपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत... ऐन दिवाळीत महागाईचा झटका; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

SCROLL FOR NEXT