BJP leader Sambit Patra Dainik Gomantak
देश

MP Sambit Patra : अब्जाधीश उद्योगपतीमुळे अडचणीत आले राहुल गांधी? भाजपने केले मोठे आरोप, जाणून घ्या अमेरिका कनेक्शन

BJP leader Sambit Patra: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार संबित पात्रा यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधीं यांना 'देशद्रोही' म्हणत जोरदार हल्ला चढवला.

Manish Jadhav

New Delhi News: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार संबित पात्रा यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधीं यांना 'देशद्रोही' म्हणत जोरदार हल्ला चढवला. पात्रा यांनी गुरुवारी (5 डिसेंबर) पत्रकार परिषद घेवून राहुल गांधींवर सडकून टीका केला. राहुल गांधी हे "सर्वोच्च दर्जाचे देशद्रोही" आहेत, असे पात्रा म्हणाले. एवढ्यावरच न थांबता पात्रा यांनी राहुल यांचे कनेक्शन भारतविरोधी शक्तींशी जोडले. पत्रकार परिषदेत पात्रा यांनी 'त्रिकोणा'चा संदर्भ देत ते भारताविरुद्ध कट रचत असल्याचे सांगितले.

पात्रा म्हणाले की, “या त्रिकोणात एका बाजूला अमेरिकास्थित जॉर्ज सोरोस यांच्यासह काही अमेरिकन एजन्सी तसेच त्यांचे फाउंडेशन आहे, त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूला ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग नावाचे एक मोठे न्यूज पोर्टल आहे. तर तिसऱ्या बाजूला आणि त्रिकोणाची सर्वात महत्वाची बाजू म्हणजे राहुल गांधी आहेत.''

राहुल गांधी यांना 'देशद्रोही' म्हणण्यामध्ये मला काही एक संकोच वाटत नाही, असेही ते पुढे म्हणाले. दरम्यान, एका अहवालाचा हवाला देत पात्रा म्हणाले की, ''जॉर्ज सोरोस यांच्या ओपन सोसायटी फाउंडेशनने फंडिंग केलेली OCCRP ही जागतिक मीडिया एजन्सी त्या लोकांसाठी काम करते जी त्यांना फंड देते. राहुल गांधींनी देशाची बदनामी करण्याच्या उद्देशाने ओसीसीआरपी अहवालांचा हवाला दिला.''

पात्रा पुढे असेही म्हणाले की, “जुलै 2021 मध्ये, जेव्हा कोरोना व्हायरसचा प्रभाव जागतिक स्तरावर दिसून येत होता, तेव्हा OCCRP ने एक लेख प्रकाशित केला होता की, ब्राझीलने भारताला Covaxin Covid-19 लसीच्या $324 दशलक्ष करारातून बाहेररचा रस्ता दाखवला होता. त्यावेळी, OCCRP च्या याच लेखाचा हवाला देत राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन भारत सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता.''

MediaPart च्या अलीकडील अहवालात असे दिसून आले आहे की, जॉर्ज सोरोस यांनी OCCRP ला निधी दिला आहे, ज्याची स्थापना Drew Sullivan यांनी केली आहे. 2023 मध्ये OCCRP पत्रकारांना पाठवलेल्या ईमेलमध्ये सुलिव्हनने कबूल केले की, हे खरे आहे. त्यांच्या एनजीओने सुरुवातीच्या काळात अमेरिकेवर रिपोर्ट केले नाहीत. कारण त्यांचे सर्व बजेट वॉशिंग्टन आणि ओपनने दिले होते, जी जॉर्ज सोरोस यांनी स्थापन केलेली संस्था आहे.

सुलिव्हनने लिहिले होते की, "आम्ही अमेरिकन रिपोर्टसाठी अमेरिकन सरकार किंवा सोरोस यांच्याकडून मिळालेल्या निधीचा वापर करु शकत नाही. तेव्हापासून, ओसीसीआरपीने फंडिंगसाठी नवे स्त्रोत शोधायला सुरुवात केली.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Goa News Live Update: रुमडामळच्या ४ अपात्र पंच सदस्यांना १६ ऑगस्टपर्यंत स्थगिती

बाथरुममध्ये ढसाढसा रडला होता विराट कोहली; युजवेंद्र चहलने सांगितला वर्ल्ड कपमधील ‘त्या’ पराभवाचा किस्सा!

Nishaanchi: 'दिल थामिऐ, जान बचाइए'! बाळासाहेब ठाकरेंचा नातू बॉलीवूडमध्ये झळकणार; नुसत्या पोस्टरनेच घातलाय धुमाकूळ

Kidney Infection: किडनी इन्फेक्शन म्हणजे काय? पुरुषांच्या तुलनेत महिलांना सर्वाधिक धोका; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि बचावात्मक उपाय!

SCROLL FOR NEXT