
Yuzvendra Chahal Interview: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. सगळ्यांना मैदानावरील त्याची आक्रमक शैली दिसते, मात्र त्याच्या भावना तो सहसा कोणाला दाखवत नाही. याचदरम्यान आता भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup) भारताचा पराभव झाल्यानंतर आपण विराटला बाथरुममध्ये ढसाढसा रडताना पाहिल्याचे चहलने सांगितले आहे.
राज शमानी याच्या पॉडकास्ट शोमध्ये बोलताना चहलने हा किस्सा सांगितला. राजने त्याला विचारले की, आयपीएल 2025 मध्ये (IPL 2025) ट्रॉफी जिंकल्यानंतर विराटला रडताना पाहिले, पण याआधी कधी त्याला रडताना पाहिले होते का?
यावर चहल म्हणाला, "2019च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) सेमीफायनलमध्ये (Semi-final) आम्ही हरलो, तेव्हा मी विराटला बाथरुममध्ये रडताना पाहिले. त्यावेळी जवळपास सर्वच खेळाडू बाथरुममध्ये रडत होते. जेव्हा मी शेवटच्या क्षणी फलंदाजीसाठी गेलो, तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्यावेळी सर्वच खेळाडू प्रचंड दुःखी होते."
याच मुलाखतीत चहलने विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या नेतृत्वातील (Captaincy) फरकावरही भाष्य केले. चहल म्हणाला, "विराट कोहली नेहमीच आक्रमक असतो. तो मैदानात प्रचंड ऊर्जावान असतो. तर रोहित शर्माचा स्वभाव थोडा वेगळा आहे. रोहित भाई ज्या पद्धतीने मैदानात वावरतो, ते मला आवडते. दोघेही खूप चांगले कर्णधार आहेत."
दरम्यान, चहलने सांगितलेल्या या किस्स्यामुळे खेळाडूंच्या भावना आणि मैदानाबाहेरील त्यांच्या मानसिकतेची एक वेगळी बाजू समोर आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.