Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा डोक्याला शॉट लावणारा अजब प्रकार व्हायरल, नेटकरीही चक्रावले; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे ट्राय करु नका...'

Food Combination Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा विचित्र खाद्यपदार्थांचे कॉम्बिनेशन व्हायरल होत असतात.

Manish Jadhav

Food Combination Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा विचित्र खाद्यपदार्थांचे कॉम्बिनेशन (Food Combination) व्हायरल होत असतात. यापूर्वी मॅगी चाय, फँटासोबत अंडी, आणि भेंडीचा समोसा यांसारख्या कॉम्बिनेशन्सनी लोकांना आश्चर्यचकित केले होते. मात्र, आता एका नव्या आणि अनोख्या कॉम्बोने खाद्यप्रेमींना अक्षरशः धक्का दिला आहे.

नुकताच एका कंटेंट क्रिएटरने एका वेगळ्या फूड कॉम्बोचा प्रयोग केला आणि आपल्या फॉलोअर्सना विचारले, "तुम्ही कधी आईस्क्रीमसोबत चपाती खाल्ली आहे का?" गरमागरम चपाती आणि थंडगार डेझर्ट (आईस्क्रीम) या अनोख्या कॉम्बिनेशनने यूजर्संना विचारात पाडले. अनेकांना हा विचित्र प्रयोग करण्याची प्रेरणा त्या क्रिएटरला कुठून मिळाली, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @hungryguplii नावाच्या हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये ती कंटेंट क्रिएटर आत्मविश्वासाने म्हणते की, हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करण्यासारखा आहे आणि त्याचा स्वाद खूप चांगला लागतो. ती आपल्या दर्शकांना हे अनोखे कॉम्बिनेशन ट्राय करण्यास प्रोत्साहित करते. हा व्हिडिओ पाहून यूजर्संनी सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया दिल्या. काही यूजर्संनी दोन चांगले खाद्यपदार्थ अशा प्रकारे एकत्र करुन खराब केल्याबद्दल या महिलेवर टीकेची झोड उठवली.

यूजर्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.

  • एका युजरने लिहिले की, "हा तर आईस्क्रीमवर अन्याय आहे."

  • दुसऱ्याने कमेंट केली की, "हे मला आंतर-धार्मिक विवाहासारखे वाटत आहे."

  • तिसऱ्या युजरने स्पष्ट सल्ला दिला, "घरी किंवा कुठेही कधीही याचा प्रयोग करु नका."

  • चौथ्या युजरने याला "आईस्क्रीमसोबत देसी वॅफल" (Desi Waffle) असे म्हटले.

  • तर शेवटी पाचव्याने युजरने, "तू स्वयंपाकात खूप आळशी (Lazy) आहेस, हे मी समजू शकते! पुढच्या वेळी मी तुझ्यासाठी काहीतरी बनवीन," अशी कमेंट केली.

हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून 'चपाती आणि आईस्क्रीम'चे हे कॉम्बिनेशन पाहून नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT