Jeet Adani Marriage Dainik Gomantak
देश

Jeet Adani Marriage: शाही विवाहसोहळ्याचा खर्च टाळला, समाजसेवेसाठी देणार 10 हजार कोटी; अदानींची घोषणा

Jeet and Diva Marriage: अदानी यांची सून दिवा ही विख्यात हिरे व्यापारी जैमिन शहा यांची कन्या आहे.

Pramod Yadav

अहमदाबाद : अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी याचा विवाह परंपरागत पद्धतीने आणि अत्यंत साधेपणे पार पडला. महा कुंभमेळ्यातील भेटीदरम्यान जाहीर केल्याप्रमाणे गौतम अदानी यांनी मुलाचा विवाह केला. अदानी यांनी यावेळी दहा हजार कोटी रुपये समाजसेवेसाठी देण्याचे जाहीर केले.

अहमदाबाद मधील अदानी शांतीग्राम वसाहती मधील बेलवेदर क्लबमध्ये शुक्रवारी (०७ फेब्रुवारी) दुपारी जीत आणि दिवा यांचा विवाह झाला.

मुलाच्या विवाह प्रसंगी गौतम अदाणी यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

"परमपिता परमेश्वराच्या आशीर्वादाने जीत आणि दिवा हे दोघे आज विवाहबद्ध झाले आहेत. हा विवाह आज नातलग आणि परिचित यांच्या उपस्थितीत पारंपारिक रीतीरिवाज आणि ज्येष्ठांच्या शुभ आशीर्वादात पार पडला. हा एक अत्यंत छोटा आणि वैयक्तिक घरगुती समारंभ होता. त्यामुळे इच्छा असूनही सर्व हितचिंतकांना या विवाहासाठी बोलवणे आम्हाला शक्य झाले नाही, त्यामुळे आम्हाला क्षमा करावी. पुत्री दिवा आणि जीत यांच्या विवाहानिमित्त आपण त्यांना शुभ आशीर्वाद द्यावेत हीच माझी इच्छा आहे", अशा भावना गौतम अदानी यांनी व्यक्त केल्या आहेत.

जीत गौतम अदानी याच्या विवाहानिमित्त गौतम अदानी यांनी समाजसेवेसाठी जाहीर केलेली ही रक्कम वेगवेगळ्या समाजोपयोगी कामांसाठी वापरली जाईल. आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील पायाभूत उपक्रमांसाठी या देणगीतील सर्वात जास्त रक्कम खर्च होईल. अदानी जगातील एक श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात.

Jeet Adani Marriage

अदानी यांची सून दिवा ही विख्यात हिरे व्यापारी जैमिन शहा यांची कन्या आहे. हा विवाह अत्यंत साधेपणे आणि नेहमीच्या परंपरागत धार्मिक रीतीरिवाजांनुसार आणि नंतर परंपरागत गुजराती पद्धतीनुसार झाला.

जीत अदानी हा सध्या अदानी एअरपोर्ट्सचा संचालक आहे. या कंपनीतर्फे सहा आंतरराष्ट्रीय विमानतळांचे व्यवस्थापन केले जाते आणि नवी मुंबई येथील सातव्या विमानतळाच्या उभारणीचे कामही कंपनीतर्फे केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT