BITS Pilani Goa: इन्व्हेंट सुरु असतानाच मिळाली बॉम्बची धमकी; बीट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये उडाली धावपळ

Bomb Threat In BITS Pilani Campus Goa: गोव्यातील बीट्स पिलानी कॅम्पसमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली.
BITS Pilani has received a bomb threat
BITS Pilani K K Birla Goa CampusDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: सांकवाळ-झुआरीनगर येथील बीट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल शुक्रवारी (ता. ७) सकाळी मिळाल्याने कॅम्पसमध्ये धावपळ उडाली. तथापि, तपासणीअंती सदर ई-मेल खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अज्ञाताने ई मेल कोठून केला याचा शोध सायबर विभाग घेणार आहे. बीट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये शुक्रवारी सकाळी एका इन्व्हेटला आरंभ झाला होता. या इन्व्हेंट तीन दिवसीय आहे. या इन्व्हेंटमध्ये देशभरातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

BITS Pilani has received a bomb threat
Konkan Railway: गोव्यात होणाऱ्या 3 नव्या रेल्वे स्थानकांना विरोध; हिवाळी अधिवेशनात आमदारांचा विरोधी सूर

इन्व्हेंट सुरू असताना बीट्स पिलानीच्या प्रशासकीय विभागाला तेथे बॉम्ब ठेवल्याचा ई मेल मिळाला. याप्रकणी त्वरित दखल घेताना प्रशासकीय विभागाने त्वरित वेर्णा पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच वेर्णा पोलिस तेथे आले. या दरम्यान तेथे एटीएस, बॉम्ब निकामी पथक, श्वानपथक, अग्निशमन दल, रुग्णवाहिकी वगैरे तेथे आले.

BITS Pilani has received a bomb threat
Konkan Railway: कोकण रेल्वेच्या मार्गावरुन गोव्यात कोळसा वाहतूक होणार नाही; CM सावंत यांचे अधिवेशनात आश्वासन

जेथे इव्हेंट सुरू होते त्या सभागृहात सर्व विद्यार्थ्यांना व इतरांना तेथून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तेथे बॉम्ब शोध कार्याला आरंभ झाला. तथापि, तीन तासाच्या तपासणीअंती तेथे काहीच सापडले नाही. तो ई-मेल खोटा असल्याचे जाहीर केल्यावर तेथील कामकाज पुन्हा सुरू झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com