Watch Video Dainik Gomantak
देश

Bill Gates: किशोर कुमारांचे गाणं आणि जगातील एक श्रीमंत व्यक्ती भारतीय रस्त्यावर रिक्षा चालवतो तेव्हा...

बिल गेट्स यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Pramod Yadav

Bill Gates: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स भारत दौऱ्यावर आहेत. गेट्स त्यांचा कॉलेज मित्र आणि उद्योजक आनंद महिंद्रा यांची भेट घेतली. बिल गेट्स महिंद्राची ट्रेओ इलेक्ट्रिक रिक्षा चालवताना दिसत आहेत.

गेट्स यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये गेट्स इलेक्ट्रिक रिक्षा चालवताना दिसत आहेत.

बिल गेट्स यांनी भारत दौऱ्यावर असताना आनंद महिंद्रा यांची भेट घेतली होती. ट्विटरवर गेट्ससोबतचा एक फोटो शेअर करताना महिंद्रा ग्रुपच्या अध्यक्षांनी ते हार्वर्ड विद्यापीठातील वर्गमित्र असल्याचेही नमूद केले.

बिल यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये गेट्स ई-रिक्षा चालवताना दिसत आहेत. इलेक्ट्रिक ऑटो-रिक्षा असून, 131 किमी पर्यंत प्रवास करण्यास सक्षम आहे आणि 4 लोक बसू शकतात. व्हिडिओमध्ये गेट्स अगदी सहजपणे रिक्षा चालवताना दिसत आहेत. त्यांनी या रिक्षाचे कौतुकही केले आहे.

गेट्सच्या यांच्या व्हिडिओला भारतील लोकांकडून खूप पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी देखील बिल गेट्स यांचा हा व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

महिंद्रा यांनी रिक्षा चालवून पाहिल्याबद्दल गेट्स यांचे आभार मानले आहेत. आनंद महिंद्रा यांनी, "'चलती का नाम बिल गेट्स की गाडी." पुढच्या वेळी ईव्ही थ्री व्हीलरची शर्यत मी, तुम्ही आणि सचिन तेंडुलकर यांच्यात असावी असे त्यांनी लिहले आहे.

गेट्स सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या ब्लॉग आणि सोशल मीडिया हँडल्सवर सतत अपडेट पोस्ट करत आहेत. बिल गेट्स गेल्या आठवडाभरात त्यांच्या भारत दौऱ्याचा एक भाग म्हणून आनंद महिंद्रा आणि रतन टाटा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशातील लोकप्रिय लोकांना भेटत आहेत.

तत्पूर्वी, गेट्स यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा आणि विद्यमान अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन, माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, आरबीआय गव्हर्नर शक्ती कांत दास आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांची भेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT