Bijapur Bank Robbery: विजापूर जिल्ह्यतून एक बँक दरोड्याची घटना समोर आली आहे. विजापूरमधील मनगुळी शहरातील कॅनरा बँकेवर दरोडा टाकून कोट्यवधी लंपास केले. या घटनेची माहिती मिळताच विजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. याचदरम्यान आता दरोडोखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा दुसरा तिसरा कोणी नसून कॅनरा बँकेचा मॅनेजर असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी कॅनरा बँकेचे (Canara Bank) सीनियर मॅनेजर विजयकुमार, चंद्रशेखर नेरेला आणि सुनील मोका यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, गेल्या महिन्यात 25 मे रोजी मनगुळी शहरातील कॅनरा बँकेच्या खिडकीतून आरोपींनी बँकेत प्रवेश केला. त्यानंतर ते तडक बँकेतील सेफ्टी लॉकरकडे गेले. त्यांनी हे लॉकर तोडून 53.26 कोटी रुपये किमतीचे 59.97 किलो सोन्याचे दागिने आणि कोट्यवधींची रोकड लंपास केली. याप्रकरणी 26 मे रोजी मनगुळी पोलिस ठाण्यात कलम 331 (3), 331 (4), 305 (3) अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली.
दुसरीकडे, आरोपींनी बँकेतील सीसीटीव्हीचे एन व्ही आर देखील आपल्यासोबत पळवून नेले. आरोपींनी पुरावे मागे सुटू नये यासाठी पुरेपुर प्रयत्न केले. त्यांनी अगदी व्यवस्थित प्लॅन करुन बँकेवर हा दरोडा घातला. एवढचं नाहीतर त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना भीती घालण्यासाठी बँकेत बाहुली, कुंकू लिंबू इतर साहित्य टाकून भानामती करण्याचा देखील प्रयत्न केला.
मात्र पोलिसांनी (Police) या प्रकरणाचा व्यवस्थितरित्या छडा लावला. पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकत दोन कार, दहा कोटी 75 लाखांची रोकड आणि तब्बल 10.5 किलो सोन्याचे दागिने आणि वितळलेले सोन्याचे गोळे देखील ताब्यात घेतले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.