Bhupendra Patel Dainik Gomantak
देश

Gujrat: भूपेंद्र पटेल यांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, 16 मंत्रीही शपथबद्ध

आठ कॅबिनेट मंत्री, दोन स्वतंत्र प्रभार आणि सहा राज्यमंत्री आहेत.

Pramod Yadav

Bhupendra Patel Oath Ceremony: भूपेंद्र पटेल (62) यांनी गुजरातचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुजरातच्या राज्यपालांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. भूपेंद्र पटेल यांच्यानंतर 16 मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. यात आठ कॅबिनेट मंत्री, दोन स्वतंत्र प्रभार आणि सहा राज्यमंत्री आहेत.

(Bhupendra Patel takes oath as 18th Chief Minister of Gujarat)

शपथविधीनंतर पंतप्रधानांनी व्यासपीठावर नतमस्तक होऊन जनतेला नमस्कार केला. यानंतर भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाची भेट घेऊन त्यांच्यासोबत फोटो काढले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेही या सोहळ्याला उपस्थित होते. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. त्याच वेळी, दोन हजारांहून अधिक नेते आणि 200 संत देखील शपथविधीसाठी उपस्थित होते.

कॅबिनेट मंत्री

कनुभाई देसाई, हृषीकेश पटेल, राघवजीभाई पटेल, बलवंतसिंग राजपूत, भानुबेन बावलिया, कुबेरभाई दिंडोर, कुंवरजी बावडिया, अय्यर मुलुभाई बेरा

राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार

हर्ष संघवी, जगदीश विश्वकर्मा

राज्यमंत्री

पुरुषोत्तम सोळंकी, बच्चूभाई खबड, मुकेशभाई पटेल, प्रफुल्ल पानसेरिया, भिखूसिंग परमार, कुंवरजीभाई हलपती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT