Watch Video
Watch VideoDainik Gomantak

Watch Video: पंतप्रधान मोदींच्या हत्येसाठी तयार राहा; टीका करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली

काँग्रेस नेते राजा पटेरिया यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा चर्चेत आले आहे.
Published on

काँग्रेस नेते राजा पटेरिया यांचे वादग्रस्त विधान करणारा व्हडिओ समोर आला आहे. यामध्ये ते 'पीएम मोदींच्या हत्येबद्दल बोलत आहेत. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पण राजा पत्रिया यांनी नंतर आपले वक्तव्य मागे घेतले. पुढच्या निवडणुकीत मोदींचा पराभव करायचा आहे, असे ते म्हणाले. 

काँग्रेसचे माजी मंत्री राजा पटेरिया यांच्या वक्तव्यावर गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, मी पटेरिया जी यांचे वक्तव्य ऐकले, हे स्पष्ट झाले की ही महात्मा गांधींची काँग्रेस नाही.

Watch Video
Indian Navy: भारतीय लष्करात देशातील महिलांना सुवर्ण संधी, भारतीय नौदलाचा ऐतिहासिक निर्णय

काँग्रेस पक्षानेही हा वाद कमी करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद अल्वी म्हणाले की पटेरिया यांनी आधीच स्पष्टीकरण जारी केले आहे.

मात्र, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेस नेत्याविरोधात एफआयआर नोंदवण्याच्या सूचना राज्य पोलिसांना दिल्याची माहिती आहे. पटेरिया यांचे वक्तव्य निषेधार्ह असल्याचे सांगत मिश्रा म्हणाले की, कठोर कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com