Bangalore Rain Alert: एप्रिल महिन्यात असह्य होणारा उकाडा सहन केल्यानंतर बंगळुरुवासीयांना मुसळधार पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. अलीकडेच, आयएमडीने बंगळुरुमध्ये मे महिन्यात पावसाचा अंदाज वर्तवला होता. बंगळुरुमध्ये मे महिन्यात साधारणपणे 128.7 मिमी पाऊस पडतो. अशातच, आयएमडीने (IMD) आज (बुधवारी) बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी केला.
दरम्यान, यलो अलर्ट म्हणजे शहरात मुसळधार पाऊस पडेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असते तेव्हा यलो अलर्ट जारी केला जातो. यलो अलर्टमध्ये, 64.5 ते 115.5 मिमी पाऊस अपेक्षित असतो. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करणे म्हणजे सध्या कोणताही धोका नसून हवामान केव्हाही धोकादायक स्थिती निर्माण करु शकते.
तथापि, पुढील दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहरातील कमाल आणि किमान तापमान 35 अंश सेल्सिअस आणि 22 अंश सेल्सिअस राहील. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरात पाऊस पडत असून, परिणामी तापमानात लक्षणीय घट झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला शहरातील तापमान 38 अंश सेल्सिअस होते, ते मंगळवारी 33.8 अंश सेल्सिअसवर आले, ही मोठी घसरण आहे. मंगळवार हा शहरातील महिनाभरातील सर्वात थंड दिवस ठरला. बंगळुरु ग्रामीण जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या होसाकोटेमध्ये मुसळधार पाऊस पडला. गेल्या चार दिवसांत बंगळुरु शहरात 4 मिमी ते 30 मिमी पाऊस झाला.
दरम्यान, पावसामुळे असह्य होणाऱ्या उष्णतेपासून बंगळुरुवासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आयएमडीने 3 मे रोजी कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस नोंदवले, जे शहरातील मे महिन्याच्या सरासरी तापमानापेक्षा सुमारे चार अंशांनी जास्त होते. त्याचवेळी, यावर्षी 2 मेची रात्र बंगळुरुमध्ये 24.8 अंश सेल्सिअस तापमानासह सर्वात उष्ण रात्र ठरली. येत्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, या आठवड्यात बंगळुरुमध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे. 12 आणि 13 मे रोजी पुढील आठवड्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे या आठवड्यात शहर आणि उपनगरातील उष्ण हवामानाची समस्या कमी होईल असे दिसते.
वास्तविक, मे महिन्यात बंगळुरुला अनेकदा वादळाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून कधीही दस्तक देऊ शकतो. तत्पूर्वी, बंगळुरुमध्ये झालेल्या पावसामुळे शहरवासीयंना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बंगळुरुमध्ये अनेकदा मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचून वाहतूक विस्कळीत होते. शहरातील काही भागात ही समस्या दिसूनही आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.