Weather Forecast IMD Issues Rainfall Alert For Many State: भारतीय हवामान विभागा (IMD) ने गोवा, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांसाठी हवामान अलर्ट जारी केला आहे. IMD नुसार या राज्यांमध्ये 25 आणि 27 नोव्हेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
27 नोव्हेंबरच्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मच्छिमारांना पुढील दोन दिवस दक्षिण अंदमान समुद्रात जाऊ नये असा सल्ला दिला आहे.
IMD ने अलर्ट जारी करत म्हटले आहे की, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, दक्षिण राजस्थान, गोवा (Goa), तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीसह अनेक राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी दक्षिण अंदमान समुद्रात आणि आसपास चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. 27 नोव्हेंबरच्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रीय राजधानीत शनिवारी सकाळी हलके धुके पडेल आणि आकाश अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कमाल तापमान 25 आणि किमान तापमान 9 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. शुक्रवारी दिल्लीत (Delhi) कमाल तापमान 28.8 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 9.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
त्याचवेळी, शनिवारी पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये आकाश निरभ्र असेल. ‘सिटी ऑफ जॉय’ अर्थात कोलकाता इथे कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. त्याचवेळी, सिक्कीम आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.
याशिवाय, जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी कोरडे हवामान कायम राहील. त्याचवेळी, श्रीनगरमध्ये आकाश निरभ्र राहील आणि कमाल तापमान 13 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 0 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
IMD ने सांगितले की, हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये शनिवारी सूर्यप्रकाश असेल. इथे कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 8 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. उंच डोंगराळ भागात कोरडे हवामान राहील. गेल्या 24 तासांत सुमधो (-) 1 अंश सेल्सिअस इथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.
त्याचवेळी, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल प्रदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. यासोबतच, एक-दोन ठिकाणी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, तिरुवल्लूर, रानीपेट आणि कांचीपुरम जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.