IMD Rainfall Alert: येत्या चार दिवसात 'या' राज्यांमध्ये बरसणार सरी, हवामान खात्याने दिला अलर्ट!

IMD Rainfall Alert: तमिळनाडू, केरळ, माहे, साऊथ इंटीरियर कर्नाटकमध्ये 3 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान विभागाने गुरुवारी अपडेट दिले आहे.
Heavy Rainfall Alert
Heavy Rainfall Alert Dainik Gomantak
Published on
Updated on

IMD Rainfall Alert: दक्षिण भारतात येत्या चार दिवसात मुसळधार पाऊस पडणार आहे. तमिळनाडू, केरळ, माहे, साऊथ इंटीरियर कर्नाटकमध्ये 3 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान विभागाने गुरुवारी अपडेट दिले आहे. मात्र, पुढील पाच दिवस इतर भागातील हवामानात मोठा बदल होणार नाही.

दरम्यान, गेल्या 24 तासांबद्दल बोलायचे झाल्यास, अंदमान आणि निकोबार बेट, केरळ, तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. त्याचवेळी, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ (Kerala), माहे येथे 2 ते 6 नोव्हेंबर आणि साऊथ इंटीरियर कर्नाटकमध्ये 3 ते 5 नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पावसाची नोंद होईल.

त्याचवेळी, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, जम्मू आणि काश्मीर, लडाख गिलगिट बाल्टिस्तान, हिमाचल प्रदेशमध्ये 2 आणि 3 नोव्हेंबरला पाऊस आणि बर्फवृष्टी होईल. याशिवाय, 3 नोव्हेंबरला उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते.

त्याचवेळी, 7 नोव्हेंबरपासून उत्तर हिमालयीन प्रदेशात एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स दार ठोठावत आहे, ज्यामुळे येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.

Heavy Rainfall Alert
IMD Rainfall Alert: आली आनंदाची बातमी! येत्या 5 दिवसांत बरसणार मुसळधार सरी, हवामान खात्याने दिली मोठी अपडेट!

दिल्ली-एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता गंभीर पातळीवर पोहोचली आहे

दिल्लीतील (Delhi) अनेक भागांतील हवेच्या गुणवत्तेची पातळी गुरुवारी 'गंभीर' श्रेणीत पोहोचली आणि शहरात सलग तिसऱ्या दिवशी धुके पसरले.

पराली जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ आणि प्रतिकूल हवामानादरम्यान, शास्त्रज्ञांनी चेतावणी दिली आहे की, दिल्ली-राष्ट्रीय राजधानी प्रदेश (NCR) मध्ये पुढील दोन आठवड्यांत प्रदूषणाची पातळी वाढेल.

हे चिंताजनक आहे कारण अनेक भागात हवेचा दर्जा निर्देशांक आधीच 400 पेक्षा जास्त आहे. यामुळे लहान मुले आणि वृद्धांमध्ये दमा आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्या वाढू शकतात, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सकाळी 10 वाजता शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 351 नोंदवला गेला. 24 तासांची सरासरी AQI बुधवारी 364, मंगळवारी 359, सोमवारी 347, रविवारी 325, शनिवारी 304 आणि शुक्रवारी 261 होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com