flyover closure Bengaluru Dainik Gomantak
देश

Bengaluru Flyover: बंगळूरात HSR Layout उड्डाणपुल बंद; वाहतूक कोंडीमुळे प्रवासी संतप्त

Bengaluru Traffic News: HSR लेआउट जवळील उड्डाणपूल अचानक बंद करण्यात आल्याने बुधवारी(१२ फेब्रुवारी) बेंगळुरूमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला

Akshata Chhatre

बंगळूर: बेंगळुरू मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) द्वारे सुरू असलेल्या मेट्रो बांधकामामुळे HSR लेआउट जवळील उड्डाणपूल अचानक बंद करण्यात आल्याने बुधवारी (१२ फेब्रुवारी) बेंगळुरूमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर बेंगळुरू ट्रॅफिक पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीनंतर शहरात विशेषतः आऊटर रिंग रोड (ORR) वर वाहतूक कोंडी झाली आहे.

बंगळूर वाहतूक पोलिसांनी 'एक्स' वर एक सूचना जारी करत याबाबत माहिती दिली आहे. "एचएसआर लेआउटमधील १४ व्या मेनजवळ बीएमआरसीएलच्या स्लाइडिंग गर्डलमध्ये बिघाड झाल्यामुळे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे आणि म्हणूनच प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आलाय. सिल्क बोर्डकडे जाणारी वाहतूक १९ व्या मेनमार्गे वळवण्यात येत आहे.

"कृपया सहकार्य करा आणि आपल्या प्रवासाची योजना करा," असे पोलिसांनी जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे. मात्र अचानक उड्डाणपूल बंद केल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. बांधकाम शनिवारी किंवा रात्रीच्या वेळी का केले नाही, असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. बुधवार हा कामाचा दिवस असल्यामुळे वाहतूक जास्त असते आणि उड्डाणपूल बंद केल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे, असे काही प्रवाशांनी 'एक्स' वर म्हटले आहे.

सिल्क बोर्ड उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे अनेक युजर्सनी सोशल मीडियावर सांगितले. अशा मोठ्या प्रमाणात रस्ते बंद करण्याबाबत प्रशासनाने आधी सूचना द्यायला हवी, जेणेकरून लोकांना त्यांच्या प्रवासाची योजना व्यवस्थित बनवता येईल असेही काही नेटकारी म्हणाले आहेत.

सध्या उत्तर बंगळूरच्या भागात एअरो इंडिया शो सुरू असल्यामुळे वाहतुकीची समस्या आधीच वाढली आहे. त्यात आता या उड्डाणपुलाच्या बंदमुळे आणखी भर पडली आहे. आगामी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमुळे आणखी जास्त लोक शहरात येणार आहेत, त्यामुळे वाहतुकीची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. मात्र, वाहतूक पोलिसांनी याची दखल घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये अधिक कर्मचारी तैनात केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

SCROLL FOR NEXT