Bengaluru Crime: बंगळुरुतील फार्म हाऊसमध्ये सुरु होती ‘रेव्ह पार्टी’; CCB चा छापा, 5 जण गजाआड!

Bengaluru Crime: शहराजवळील एका फार्म हाऊसमध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती केंद्रीय गुन्हे शाखेला (सीसीबी) मिळाली.
Bengaluru Crime
Bengaluru CrimeDainik Gomantak

Bengaluru Crime: बंगळुरु येथील एका फार्म हाऊसमध्ये रेव्ह पार्टीचे प्रकरण समोर आले आहे. शहराजवळील एका फार्म हाऊसमध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती केंद्रीय गुन्हे शाखेला (सीसीबी) मिळाली. त्यावर सीसीबीच्या पथकाने फार्म हाऊसवर छापा टाकून कारवाई केली. सीसीबीच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात एमडीएमए गोळ्या आणि कोकेनची खेप जप्त केली आहे. याप्रकरणी सीसीबीने पार्टीच्या आर्गेनाइजरसह पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये तीन ड्रग्ज तस्करांचाही समावेश आहे.

सीसीबीच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाची कारवाई

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, CCB च्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने मोठ्या प्रमाणात MDMA गोळ्या आणि कोकेन जप्त केले आहे. फार्म हाऊसमध्ये एमडीएमए आणि कोकेनसह 45 ग्रॅम ड्रग्ज सापडले. रिपोर्ट्स आणि माहितीनुसार, पार्टीत सुमारे 101 लोक सामील होते, ज्यात 71 पुरुष आणि 30 महिला होत्या.

Bengaluru Crime
Bengaluru Crime: कधी व्हायचा डॉक्टर तर कधी इंजिनियर; 9 वर्षांत भामट्याने बसवले 15 जणींशी घर

जीआर फार्म हाऊसमध्ये पार्टी सुरु होती

हैदराबादच्या (Hyderabad) वासूने जीआर फार्म हाऊसवर ही पार्टी आयोजित केली होती. यामध्ये आंध्र प्रदेश आणि बंगळुरु येथील 100 हून अधिक लोक सहभागी झाले होते. पार्टीत 25 हून अधिक तरुणी, डीजे, मॉडेल्स आणि टेक्निकल तज्ञही सहभागी झाले होते. सूर्यास्तापासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी 5 वाजता सुरु झालेली पार्टी सकाळी 6 वाजेपर्यंत सुरु होती. आर्गेनाइजरने 40 ते 50 लाख रुपयांच्या महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या या एकदिवसीय कार्यक्रमासाठी आंध्र प्रदेशातील लोकांना आमंत्रित केले होते.

Bengaluru Crime
Bengaluru Water Crisis: ''....टॉयलेट वापरण्याच्या बहाण्याने लोक जातायेत मॉलमध्ये''; बंगळुरुमध्ये जलसंकट गडद

आंध्रच्या आमदाराचा पासपोर्ट मर्सिडीजमध्ये सापडला

छाप्यादरम्यान पोलिसांना (Police) घटनास्थळी पार्क केलेल्या मर्सिडीज-बेंझमध्ये आंध्र प्रदेशच्या आमदाराचा पासपोर्ट सापडला. हा पासपोर्ट आमदार काकाणी गोवर्धन रेड्डी यांचा असल्याचे सांगण्यात आले. फार्म हाऊसमधून मर्सिडीज-बेंझ, जग्वार आणि ऑडीसह पंधराहून अधिक लक्झरी वाहने जप्त करण्यात आली आहेत, ज्यावरुन असे दिसून येते की रेव्ह पार्टीमध्ये अनेक बडे लोक उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com