Arpita Mukherjee & Partha Chatterjee Dainik Gomantak
देश

पार्थ चॅटर्जींना 18 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी, 'Arpita Mukherjee च्या जीवाला धोका'

Arpita Mukherjee & Partha Chatterjee: पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना आज कोलकाता सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Bengal Teacher Recruitment Scam: पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना आज कोलकाता सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही 18 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तत्पूर्वी, कोलकाता येथील विशेष न्यायालयाने बुधवारी माजी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत 5 ऑगस्टपर्यंत वाढ केली.

दरम्यान, अर्पिता चॅटर्जी यांना 25 जुलै रोजी शिक्षक भरती प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. आजच्या सुनावणीत अर्पिता मुखर्जींच्या वकिलाने त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. आम्हाला त्यासाठी डिव्हिजन 1 कैदी श्रेणी हवी आहे.

दुसरीकडे, पार्थ चॅटर्जी (Arpita Mukherjee) यांच्या वकिलाने सांगितले की, 'या प्रकरणी 22 जुलै रोजी ईडीने (ED) त्यांच्या घरावर छापा टाकला तेव्हा काहीही सापडले नाही. गुन्ह्यात सहभागी नसलेल्या व्यक्तीला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.' चॅटर्जी यांच्या वकिलांनी जामीनासाठी न्यायालयात (Court) अर्ज दाखल केला, तेव्हा ईडीने त्यास विरोध केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT