Mamata Banerjee Meeting With Sri Lankan President  Dainik Gomantak
देश

ममतांना विचारलं, 'तुम्ही इंडिया आघाडीचं नेतृत्व करणार का... श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना एवढा का रस?

Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत.

Manish Jadhav

Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. दरम्यान, दुबई विमानतळावर त्यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली.

बैठकीत ममता बॅनर्जी यांनी त्यांना नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बंगाल बिझनेस समिटसाठी आमंत्रित केले. यादरम्यान रानिल विक्रमसिंघे यांनी ममता बॅनर्जींना विचारले की, तुम्ही इंडिया आघाडीचं नेतृत्व करणार आहात का?

यावर बॅनर्जींनी हसत उत्तर दिले की हे जनतेवर अवलंबून आहे. यानंतर दोन्ही नेते हसायला लागले.

बंगाल ग्लोबल बिझनेस समिट

वास्तविक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दुबई आणि स्पेनच्या दौऱ्यावर आहेत. 21-22 नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगालमध्ये बिझनेस समिट होणार आहे.

दरम्यान, दुबई आणि स्पेन दौऱ्यात ममता अनेक बिझनेस समिटला हजेरी लावणार आहेत. या प्रवासादरम्यान त्यांनी दुबई विमानतळावर श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली.

यावेळी, ममता यांना त्यांना नोव्हेंबरमध्ये कोलकाता येथे होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिट 2023 मध्ये येण्याचे निमंत्रणही दिले. यादरम्यान त्यांच्या भेटीत मनोरंजक प्रश्नोत्तरांचा खेळ रंगला.

रानिल विक्रमसिंघे यांनी ममतांना विचारले

त्याचं झालं असं की, श्रीलंकेचे (Sri Lanka) राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी ममता बॅनर्जींना विचारलं की, तुम्ही इंडिया आघाडीचं नेतृत्व करणार आहात का?

रानिल विक्रमसिंघे यांच्या या प्रश्नावर ममता यांनी आधी स्मितहास्य केले आणि त्यांनी ते जनतेवर अवलंबून असल्याचे सांगितले. यानंतर आम्ही नक्कीच सत्तेत येऊ, असं त्या म्हणाल्या.

ममता बॅनर्जी मंगळवारी दुबईला पोहोचल्या. बुधवारी त्यांनी दुबईहून स्पेनला जाण्यासाठी फ्लाइट घेतली.

दरम्यान, या भेटीबाबत ममता यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, त्यांच्या शुभेच्छांमुळे मला आनंद झाला आणि मी त्यांना कोलकाता येथे होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिट 2023 मध्ये आमंत्रित केले आहे.

विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेला भेट देण्याचे निमंत्रण दिल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या पोस्टसोबतच ममता यांनी भेटीचा फोटोही शेअर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

SCROLL FOR NEXT