Belgaum BJP leader objectionable photo viral in goa Dainik Gomantak
देश

गोव्यात प्रचारावेळी बेळगावच्या नेत्याने मांडला अश्लीलतेचा बाजार

गोव्यातील घटनेने बेळगावच्या राजकारणात खळबळ; बड्या नेत्याचे अश्लिल फोटो व्हायरल

दैनिक गोमन्तक

देशात पाच राज्यात पुढील महिन्यात निवडणुका (Goa Election 2022) होणार आहे. त्यापैकीच एक गोवा राज्य आहे. गोवा राज्यात निवडणुकीच्या तोंडावर प्रचारासोबतच पक्षांतरालाही वेग आला आहे. अशाच एका मतदारसंघाच्या प्रचाराला गोव्यामध्ये (Goa) गेलेल्या बेळगाव (Belgaum) भाजपाच्या (BJP) एका नेत्याने अश्लीलतेचा बाजार मांडत नियमांच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याच्या चर्चा होत आहे. (Belgaum BJP leader objectionable photo viral in goa)

गोवा राज्यात निवडणुकीच्या प्रचाराला गेलेल्या भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षातील एका नेत्याने स्वतःचाच बाजार मांडल्याचे समोर आले आहे. गोव्यात गेल्यावर लोकांनी बेभान होतात हे स्वाभाविक असले तरी राजकीय नेत्यांना बेभान होणं परवडणारं नसतं. या भाजपच्या नेत्याने बेभान होत नशेतच आपले नग्न फोटो स्वत:च सोशल मिडियावर व्हायरल केले आहेत. विशेष म्हणजे हे फोटो त्याने स्वत: भाजप पक्षाच्या कर्नाटक राज्यातील राज्यस्तरीय ग्रुपवर टाकले आणि बेधुंद अश्लीलतेचा बाजार किळसवाणा ठरला. गोव्यात निवडणूक प्रभारी (Goa Election 2022) म्हणून काही मतदार संघाच्या प्रचाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर असताना हे नेमके काय चालले आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या कृतीमुळे पक्षाबरोबरच बेळगाव जिल्ह्याचीही लाज या नेत्याने काढल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हा अध्यक्षाच्या या प्रकारामुळे नेता चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

त्यानंतर घडलेला प्रकार त्याहून भयंकर होता. पक्षाच्या ग्रुप वर पडलेल्या या फोटोचा स्क्रीन शॉट काढून पक्षातीलच एका व्यक्तींनी व्हायरल केला आहे. यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांना आयतेच कारण मिळाले. नेत्याच्या या अश्लील कृत्याचा मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर गोव्याच्या राजकारणात पुन्हा चर्चेचा ठरत आहे. बेळगावातील अनेक माध्यमानी या बातमीची दखल घेतली. निवडणुकीच्या प्रचाराला गेलात की गोव्यात ऐयाशी करायला गेलात असा सवाल सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोलवाळमध्ये टॅक्सी चालकांची गर्दी! मोपा विमानतळावरील 'वसुली' विरोधात आंदोलन; 210 रुपये शुल्कामुळे संतापाची लाट

Dhirio in Colva: सुरावलीत पुन्हा धीरियोचा थरार, पोलिसांकडून FIR दाखल; Viral Video वरुन चर्चा..

Savoi Verem: झुळझुळ वाहणारे शीतल झरे, बागायतींनी नटलेला परिसर; मांडवीच्या कडेवर वसलेला गाव 'सावईवेरे'

Goa History: ‘पोर्तुगिजांनो चालते व्हा'! डॉ. गायतोंड्यांना अटक केली, 17 फेब्रुवारी 1955ला अनेक सत्याग्रही म्हापशाला जमा झाले..

Nightclubs In Goa: गोवेकरांना मारक ठरू शकणारे 'नाइटक्लबांचे जाळे' तोडून टाकावेच; गोव्याचे अनिष्ट गोष्टीपासून रक्षण करावे..

SCROLL FOR NEXT