Beating retreat 2022 Dainik Gomantak
देश

Beating retreat 2022: 1000 ड्रोनने उजळले आकाश

बीटिंग द रिट्रीटने झाली प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची औपचारिक सांगता. कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ड्रोन शो. यंदाच्या बीटींग द रिट्रीट सोहळ्यामध्ये 1,000 ड्रोन हे आकाशात रंगतदार ठरले.

दैनिक गोमन्तक

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाचा समारोप सोहळा थाटात बीटिंग द रिट्रीटने सुरू झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मुख्य उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi), संरक्षणमंत्री राजानाथ सिंग सह तिन्ही दलांच्या प्रमुखांसह अनेक मान्यवर या समारंभात उपस्थित होते. (Beating retreat 2022)

राष्ट्रपती (President) रामनाथ कोविंद यांना अंगरक्षकांनी सलामी देउन या कार्यक्रमास सुरूवात झाली. प्रजासत्ताक (Republic day)दिनाच्या सोहळ्याची औपचारिक सांगता म्हणजे 'बीटिंग रिट्रीट' होय. या सोहळ्याचे आयोजन 29 जानेवारी रोजी केल्या जाते. दिल्ली येथिल विजय चौकात दरवर्षी बीटिंग द रिट्रीट सोहळ्याचे आयोजन केल्या जाते. यात सैन्याच्या विविध 26 धून वाजवल्या जातात. यावर्षी केरळच्या (Keral)हिंद सेनेच्या धूनचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमात संगीत महोत्सवाचेही आयोजन करण्यात येते. यात कदम कदम बढ़ाए जा ही धून वाजवली जाते. कॅप्टन राम सिंग आणि मेजर एचबी ब्राल यांनी तयार केली असून, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेतील हे रेजिमेंटल गाणे होते.

1000 ड्रोन ठरले समारंभाचा भाग

कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ड्रोन शो. यंदाच्या बीटींग द रिट्रीट सोहळ्यामध्ये 1,000 ड्रोन हे आकाशात रंगतदार ठरले. या ड्रोनच्या मदतीने भारताचा इतिहासाची विविध दृश्ये विलक्षण पद्धतीने आकाशात साकारल्या गेली. चीन-ब्रिटन आणि रशियानंतर भारत हा चौथा देश असेल जिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रोन शो आयोजित करण्यात आला.

काय आहे बीटिंग रिट्रीट

प्राचीन लष्करी परंपरेचा एक भाग बीटिंग रिट्रीट आहे. हा एक समारंभ आहे. दिवस संपल्यानंतर युद्धभूमीवरील सैन्य त्यांच्या बॅरेकमध्ये लष्करी ट्यूनवर परतते. परततांना ध्वज उतरवण्यात येतो. त्यामुळे प्रजासत्ताक दिनादरम्यान सशस्त्र दलाच्या तुकड्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर बॅरेकमध्ये परत येतात. प्रजासत्ताक दिनाच्या तीन दिवसांनी म्हणजे 29 जानेवारी रोजी सायंकाळच्या वेळी बीटिंग रिट्रीट सोहळ्याचे आयोजन केले जाते. लष्कर बॅरेकमध्ये परत आल्याचे संकेत हा कार्यक्रम देतो. तसेच वाघा बाॅर्डर,अटारी बाॅर्डर येथे नेहमीच हा सोहळा होत असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT