Jharkhand Crime News Dainik Gomantak
देश

Jharkhand: संतापजनक! टिकली लावून शाळेला गेल्याने मारहाण; मानसिक धक्का बसल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या

Jharkhand News: मृत मुलीच्या पालकांनी आणि स्थानिकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात निदर्शने केली, त्यानंतर पोलिसांना तपास आणि कारवाई करण्यास सुरुवात केली.

Ashutosh Masgaunde

Jharkhand Crime News: झारखंडमधील धनबाद येथील शाळेत कपाळावर 'टिकली' लावल्याबद्दल मारहाण केल्यामुळे शालेय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) चे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये सांगितले की, 'टिकली' लावून शाळेत गेल्यामुळे एका विद्यार्थिनीने मारहाण केल्यामुळे आत्महत्या केल्याची नोंद आहे.

ते म्हणाले की, एनसीपीसीआरने या प्रकरणाची दखल घेतली असून, त्यांची टीम तपासासाठी धनबादला जाणार आहे.

धनबादच्या तेतुलमारी भागात सोमवारी ही घटना घडली. जिथे मंगळवारी मृत मुलीच्या पालकांनी आणि स्थानिकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात निदर्शने केली, त्यानंतर पोलिसांना तपास आणि कारवाई करण्यास सुरुवात केली.

बालकल्याण समिती (CWC), धनबाद, झारखंडचे अध्यक्ष उत्तम मुखर्जी यांनी सांगितले की, घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

"ही गंभीर बाब आहे. शाळा देखील सीबीएसई बोर्डाशी संलग्न नाही. मी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले आहे. मी आज पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आरोपीला अटक करण्यात आली आहे," असे मुखर्जी यांनी NCPCR चेअरपर्सन यांना उत्तर देताना ट्विटमध्ये म्हटले आहे.

तत्पूर्वी, राजस्थानच्या कोटा येथे जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे रविवारी सांगितले.

कोटा पोलिसांचे सर्कल इन्स्पेक्टर (सीआय) परमजीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटाच्या महावीर नगरमध्ये एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही आणि विद्यार्थी आयआयटी-जेईईची तयारी करत असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT