IND vs SA ODI Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका सध्या सुरु असून याचा शेवटचा सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाईल. या कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे (ODI) मालिका होणार आहे. या वनडे मालिकेसाठी लवकरच बीसीसीआय (BCCI) टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. या मालिकेत नियमित खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसतील, पण नेतृत्वात मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. बीसीसीआयने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, येत्या दोन दिवसांत म्हणजेच 23 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत संघाची घोषणा केली जाऊ शकते, अशी जोरदार शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या युवा फलंदाज शुभमन गिल हा भारताच्या (India) कसोटी आणि वनडे दोन्ही संघांचा कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात गिलच्या मानेला दुखापत झाली, ज्यामुळे त्याला उर्वरित सामन्यातून बाहेर पडावे लागले. गिल दुसऱ्या कसोटी सामन्यातूनही बाहेर राहण्याची शक्यता आहे, तरीही याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. गिलची दुखापत किती गंभीर आहे हे स्पष्ट नसले तरी, बीसीसीआय त्याच्या फिटनेसबाबत कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. गिल हा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिला जात असल्याने त्याला अपुऱ्या फिटनेससह मैदानात उतरवणे बोर्डाला योग्य वाटत नाही.
कसोटी मालिकेनंतर होणाऱ्या वनडे मालिकेसाठी अद्याप संघाची घोषणा झालेली नाही. 23 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत टीम इंडियाचा संघ जाहीर होईल, असा अंदाज आहे. जर गिल पूर्णपणे तंदुरुस्त नसेल, तर त्याला या वनडे मालिकेतूनही बाहेर ठेवले जाऊ शकते. बीसीसीआय गिलच्या दीर्घकालीन कारकिर्दीचा विचार करत असल्याने दुखापतग्रस्त खेळाडूला मैदानात उतरवणे धोकादायक ठरु शकते. जर शुभमन गिल वनडे मालिकेत खेळणार नसेल, तर बीसीसीआयला या मालिकेसाठी नवा कर्णधार निवडण्याची गरज भासणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन्ही दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील. मात्र, बीसीसीआय पुन्हा त्यांच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्याबद्दल फारसा विचार करेल, याची शक्यता कमी आहे. मागील वनडे मालिकेत श्रेयस अय्यर उपकर्णधार होता, पण तोही दुखापतग्रस्त आहे. श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळू शकेल की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. या परिस्थितीत, बीसीसीआयकडे कर्णधारपदाच्या पर्यायांसाठी केवळ दोन नावे शिल्लक राहतात: केएल राहुल आणि ऋषभ पंत.
गिल अनुपस्थित राहिल्यास याच दोघांपैकी एकाकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या अधिकृत घोषणेसाठी 23 नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.