IND vs SA 2nd Test: 'करो या मरो' कसोटीत भारत रचणार इतिहास, वर्ल्ड क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा ठरणार तिसरा देश; इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या यादीत होणार सामील

India Cricket Records: गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत फक्त एकदिवसीय आणि टी-20 (T20) सामने खेळले गेले आहेत.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

India 300th Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या खेळल्या जात असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. कोलकाता येथे झालेला पहिला कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेने 30 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी गुवाहाटी कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

मात्र, क्रिकेटच्या इतिहासात गुवाहाटी कसोटी आणखी एका विशेष कारणामुळे मैलाचा दगड ठरणार आहे. या सामन्यामुळे भारत (India) क्रिकेट जगतातील एका खास यादीत सामील होणार आहे, ज्यात आतापर्यंत केवळ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश होता.

भारत 300व्या कसोटीचा यजमान ठरणार

गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत फक्त एकदिवसीय आणि टी-20 (T20) सामने खेळले गेले आहेत. या मैदानावर प्रथमच टीम इंडिया (Team India) कसोटी सामना खेळण्यासाठी उतरेल. हा सामना भारतीय क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण भारत मायदेशात खेळल्या जाणाऱ्या 300 व्या कसोटी सामन्याचे यजमानपद भूषवणार आहे. या कामगिरीमुळे क्रिकेटच्या इतिहासात 300 किंवा त्याहून अधिक कसोटी सामन्यांचे यजमानपद भूषवणारा भारत जगातील तिसरा देश ठरणार आहे.

Team India
IND vs SA 2nd Test: गुवाहाटी कसोटीपूर्वी मोठा धक्का, शुभमन गिलनंतर आणखी 3 खेळाडू रुग्णालयात दाखल; कारण काय?

आतापर्यंत जागतिक क्रिकेटमध्ये केवळ दोनच देश आहेत, जिथे 300 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळले गेले आहेत: क्रिकेटचे जनक मानल्या जाणाऱ्या इंग्लंडमध्ये आतापर्यंत 566 कसोटी सामने खेळले गेले आणि दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे, ज्यांनी 450 कसोटी सामन्यांचे यशस्वीरित्या आयोजन केले आहे.

सर्वाधिक कसोटी सामन्यांचे यजमानपद भूषवणारे देश

  • इंग्लंड - 566 कसोटी सामने

  • ऑस्ट्रेलिया - 450 कसोटी सामने

  • भारत - 299 कसोटी सामने (गुवाहाटीसह 300)

  • वेस्ट इंडीज - 270 कसोटी सामने

  • दक्षिण आफ्रिका - 254 कसोटी सामने

Team India
IND vs WI 2nd Test: 12 वर्षांत पहिल्यांदाच! फॉलोऑननंतरही वेस्ट इंडीज संघाने केली कमाल, भारताविरुद्ध रचला धावांचा डोंगर; कॅम्पबेल चमकला VIDEO

ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी?

कोलकाता कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाचा नियमित कर्णधार शुभमन गिल याला मानेला दुखापत झाल्यामुळे तो सामन्यातून बाहेर पडला होता. दुसऱ्या कसोटीपूर्वी त्याचे पूर्णपणे तंदुरुस्त होणे कठीण दिसत आहे. अशा परिस्थितीत गुवाहाटी कसोटीत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. जर ऋषभ पंतने कर्णधारपद भूषवले, तर भारतीय क्रिकेटमध्ये एम.एस. धोनी याच्यानंतर कसोटीत संघाचे नेतृत्व करणारा तो दुसरा यष्टिरक्षक-फलंदाज ठरेल.

एक ऐतिहासिक मैलाचा दगड आणि संभाव्य नेतृत्वातील बदल, या दोन्ही कारणांमुळे गुवाहाटी कसोटी सामना भारतीय क्रिकेटसाठी संस्मरणीय ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com