Crime News  Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: माणुसकी ओशाळली! 65 वर्षीय व्यक्तीने केला 13 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार अन् नंतर...

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बाराबंकीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 65 वर्षीय व्यक्तीने 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बाराबंकीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 65 वर्षीय व्यक्तीने 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

यानंतर नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी वृद्धाविरुद्ध पोक्सो कायदा आणि बलात्काराच्या कलमांखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. ही घटना तीन महिन्यांपूर्वी मोहम्मदपूर खाला परिसरात घडली होती.

पोलिसांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच मुलीच्या पोटात तीव्र वेदना सुरु झाल्या. जेव्हा कुटुंबीय तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, ती सुमारे तीन महिन्यांची गर्भवती आहे.

हे ऐकल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. या संदर्भात मुलीची विचारपूस केली असता, गावातील 65 वर्षीय छेदा याने ही घटना घडवून आणल्याचे त्याने सांगितले. या घटनेची कोणाला माहिती देण्यास नकार देत आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

दुसरीकडे, भीतीपोटी आपण गप्प बसल्याचे पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना सांगितले. येथे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीचे जबाब नोंदवून आरोपी व्यक्तीविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याची चौकशी सुरु केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, या घटनेसंदर्भात मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिचे म्हणणे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले. या प्रकरणी लवकरात लवकर न्यायालयात (Court) दोषारोपपत्र सादर करण्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

तसेच, आरोपीने पीडित मुलीला अनेकवेळा आपली शिकार बनवल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. आरोपीच्या या घृणास्पद कृत्यामुळे निष्पाप मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक आशुतोष मिश्रा यांनी सांगितले की, आरोपी वृद्धाला 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

पोलीस (Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT