Uttar Pradesh Crime: 'नवरा नपुंसक असेल तर दिराशी संबंध ठेव...', सासऱ्याने नव्या नवरीला जबरदस्तीनं खोलीत केलं बंद

Uttar Pradesh: नववधूने हा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला आणि नंतर पुन्हा सासरी जाण्यास नकार दिला, मात्र घरच्यांनी तिला समजावून पुन्हा सासरी पाठवले.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बरेली येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न झाल्यावर नवरी जेव्हा सासरी पोहोचली तेव्हा तिला कळलं की तिचा नवरा नपुंसक आहे.

नववधूने हा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला आणि नंतर पुन्हा सासरी जाण्यास नकार दिला, मात्र घरच्यांनी तिला समजावून पुन्हा सासरी पाठवले. नववधू दुस-यांदा निघून सासरी पोहोचताच सासरच्या लोकांनी तिला नवऱ्याच्या भावाशी अवैध संबंध ठेवण्यास भाग पाडले.

दरम्यान, याला नववधूने विरोध केल्यावर दिराने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. एवढेच नाही तर त्याने तिचा अश्लिल व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला.

नवरीने नाराज होऊन पोलिसात तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी (Police) तपास सुरु केला आहे. आतापर्यंत आरोपी सासरच्यांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, असा पीडितेचा आरोप आहे.

Crime News
Uttar Pradesh Crime: तांत्रिकाने आधी महिलेवर बलात्कार केला, नंतर तिच्याच मुलीसोबत पळून गेला; आरोपीच्या घराबाहेर...

पीडितेचा 25 जून रोजी विवाह झाला होता

पीडितेने सांगितले की, 25 जून रोजी मीरगंज पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या तरुणाशी तिचा विवाह झाला होता. जेव्हा ती घर सोडून सासरी पोहोचली तेव्हा तिचा नवरा नपुंसक असल्याचे मधुचंद्राच्या रात्री समजले.

दुसऱ्या दिवशी तिने सासूला हा प्रकार सांगितल्यावर तिने तिला गप्प राहण्यास सांगितले. त्यानंतर नववधूने हा सगळा प्रकार माहेरच्या लोकांना सांगितला, मात्र माहेरच्या लोकांनीही तिच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही.

तसेच, 29 रोजी पुन्हा दुस-यांदा निघून वधू सासरच्या घरी पोहोचली असता एक कट रचून सासू आणि सासऱ्यांनी वधूला दिराशी संबंध ठेवण्यास सांगितले, परंतु वधूने याला विरोध केला. त्यानंतर दिराने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला आणि तिचा अश्लील व्हिडिओही बनवला.

Crime News
Uttar Pradesh Crime: आधी उपभोग घेतला नंतर गळा कापला...! अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेनं उत्तरप्रदेश हादरलं

ही घटना भावाच्या कानावर पडल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दिराने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला आणि कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने आपल्या फोनवरुन आपल्या भावाला आपला त्रास सांगितला तेव्हा भावाने गावातील काही लोकांना सोबत घेऊन बहिणीला घरी आणले.

त्याचबरोबर पीडितेने मीरगंज पोलिस ठाण्यात पती, सासरे आणि दिराविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला, मात्र गुन्हा दाखल केला नाही.

Crime News
Uttar Pradesh Crime: गुंगीचे औषध देऊन डॉक्टरने महिलेवर केला बलात्कार, फेसबुकवर केली मैत्री; आरोपी...!

व्हिडिओ व्हायरल झाल्याचे सांगून अवैध संबंध केले

पीडित महिलेचा आरोप आहे की, दिराने अनेकवेळा अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केला. त्यावर तो वारंवार सांगत होता की, जर मी तिच्याशी संबंध ठेवले नाही तर तो हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करेल.

इतकेच नाही तर तिला अनेकवेळा जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणाबाबत मीरगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी राजीव कुमार सिंह यांनी सांगितले की, महिलेच्या (Women) तक्रारीवरुन तपास सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com