Bank Holidays in June 2026 Dainik Gomantak
देश

Bank Holidays in June: लवकर कामं उरका! जून महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद; रिझर्व्ह बँकेनं जारी केलं सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक

Bank Holidays in June 2026: नवीन महिना म्हणजेच जून महिना सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत.

Sameer Amunekar

नवीन महिना म्हणजेच जून महिना सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. जर तुमची बँकेशी संबंधित काही महत्त्वाची कामे, जसे कि कर्ज मंजुरी, खाते केवायसी किंवा इतर कागदपत्रांचे काम प्रलंबित असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जून महिन्यातील सुट्ट्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार, जून महिन्यातील ३० दिवसांपैकी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि देशभरात मिळून एकूण १३ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकेच्या फेऱ्या वाया जाऊ नयेत म्हणून सुट्ट्यांचे वेळापत्रक पाहूनच आपले नियोजन करावे.

देशभरातील सर्व बँकांसाठी असणाऱ्या ६ साप्ताहिक सुट्ट्या

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात शनिवार आणि रविवार मिळून एकूण ६ दिवस देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांमध्ये कोणतेही कार्यालयीन कामकाज चालणार नाही. या ६ दिवशी धनादेश वटवणे (Check Clearance) किंवा रोख रक्कम जमा करणे अशी कामे होणार नाहीत.

साप्ताहिक सुट्ट्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

  • ७ जून: रविवार (साहित्यिक साप्ताहिक सुट्टी)

  • १३ जून: दुसरा शनिवार (बँक सुट्टी)

  • १४ जून: रविवार (साप्ताहिक सुट्टी)

  • २१ जून: रविवार (साप्ताहिक सुट्टी)

  • २७ जून: चौथा शनिवार (बँक सुट्टी)

  • २८ जून: रविवार (साप्ताहिक सुट्टी)

सुट्ट्यांचे सत्र

साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त जून महिन्यात अनेक सण, राष्ट्रीय पुरुषांची जयंती आणि प्रादेशिक उत्सव साजरे केले जाणार आहेत. यामुळे वेगवेगळ्या राज्यांत पुढील तारखांना बँका बंद राहतील:

  • १५ जून: ओडिशामधील भुवनेश्वर येथे 'राजा संक्रांति' निमित्त आणि मिझोराममधील ऐझॉल येथे 'वायएमए डे' (YMA Day) मुळे बँका बंद राहतील.

  • १७ जून: हरियाणामध्ये 'महाराणा प्रताप जयंती' निमित्त बँकांना सुट्टी असेल.

  • १८ जून: पंजाबमध्ये 'श्री गुरु अर्जुन देव जी' यांच्या शहीदी दिवसानिमित्त बँक कामकाज बंद राहील.

  • २६ जून: देशातील अनेक प्रमुख राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये 'मुहर्रम' निमित्त सार्वजनिक सुट्टी असेल.

  • २९ जून: 'संत गुरु कबीर दास जयंती' निमित्त पंजाब, हरियाणा आणि शिमला येथे बँका बंद राहू शकतात.

  • ३० जून: मिझोराममधील ऐझॉल येथे 'रेमना नी' या पर्वानिमित्त बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शाखा बंद असल्या तरी डिजिटल सेवा २४ तास सुरू

बँकांच्या सुट्ट्यांच्या दिवशी बँकेच्या शाखा पूर्णपणे बंद राहतील, ज्यामुळे चेक क्लिअरन्स, रोख रक्कम जमा करणे किंवा बँक ड्राफ्ट बनवणे यांसारख्या सेवा उपलब्ध असणार नाहीत. मात्र, यामुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन व्यवहार अडकणार नाहीत.

सुट्ट्यांच्या काळातही ऑनलाइन आणि डिजिटल बँकिंग सेवा २४ तास अखंडित सुरू राहतील. ग्राहक यूपीआय (UPI), गूगल पे, फोनपे, पेटीएम, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे आपले पैशांचे व्यवहार सहज करू शकतील. तसेच, एटीएममधून (ATM) रोख रक्कम काढणे, ऑनलाइन फंड ट्रान्सफर आणि बॅलन्स चेक करणे या सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तुम्हाला दिवाळीत काय मिळालं? सोनपापडी की ड्रायफ्रूट्स? 'या' कंपनीच्या बॉसनं कर्मचाऱ्यांना थेट iPhone 16 गिफ्ट केला! नेटकरी म्हणाले, 'व्हॅकन्सी आहे का?'

America Sanctions 2026: निवडणुकीतील पराभवाचा राग भारतावर? ट्रम्पकडून भारतीय दाम्पत्यासह 9 कंपन्यांवर कठोर निर्बंध; इराणला मदत केल्याचा आरोप

Private Bus Safety: बसची क्षमता 48, पण प्रवासी तब्बल 140! म्हापशात कामगारांच्या जिवाशी खेळ; खासगी बस ताब्यात

Goa Politics: बोरकरांची खोलकरांना नोटीस; 3 दिवसांत माफी मागा, अन्यथा 6 कोटींचा मानहानी खटला!

WPL 2027 चं बिगुल वाजलं! पहिल्याच सामन्यात स्मृतीची 'आरसीबी' भिडणार हरमनप्रीतच्या 'मुंबई इंडियन्स'शी; पाहा स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक!

SCROLL FOR NEXT