S Jaishankar with Bangladesh PM Sheikh Hasina  ANI
देश

चीनची युक्ती फसली, पंतप्रधान हसीना यांनी भारताला देऊ केले चितगाव बंदर

भारत बांगलादेशासोबत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी चितगाव बंदरात प्रवेश करू शकतो

दैनिक गोमन्तक

ढाका: चीनची चाल हाणून पाडत भारताने बांगलादेशमध्ये मोठा राजनैतिक विजय मिळवला आहे. ईशान्येकडील राज्यांशी संपर्क वाढवण्यासाठी बांगलादेशने भारताला चितगाव बंदराचा (Chittagong port) वापर करण्याची ऑफर दिली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh PM Sheikh Hasina) यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांच्यासोबत झालेल्या भेटीत ही ऑफर दिली. चितगाव बंदर हे बांगलादेशचे प्रमुख बंदर आहे. या बंदराच्या माध्यमातून भारत आणि बांगलादेशमधील द्विपक्षीय संबंध तर मजबूत होतीलच शिवाय आसाम, मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांशी संपर्कही सुधारेल.

द्विपक्षीय संबंध मजबूत

बांगलादेशची राजधानी ढाका येथे अधिकृत दौऱ्यावर आलेले जयशंकर यांनी शेख हसीना यांना त्यांचे भारतीय समकक्ष नरेंद्र मोदी यांच्या वतीने नवी दिल्लीला भेट देण्याचे निमंत्रण दिले. “पंतप्रधान शेख हसीना यांचे स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वैयक्तिक शुभेच्छा. दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे द्विपक्षीय संबंध मजबूत होत आहेत," असे ट्विट जयशंकर यांनी केले.

चितगाव बंदराचा वापर केल्यास...

'दोन्ही देशांना त्यांचे संपर्क आणखी वाढवावे लागतील. पंतप्रधान हसिना यांनी जयशंकर यांना परस्पर फायद्यासाठी संपर्क वाढवण्याची गरज आहे असे सांगितले. बांगलादेशच्या आग्नेय चितगाव बंदराचा वापर केल्यास भारताच्या ईशान्य प्रदेशाला विशेष फायदा होईल. कनेक्टिव्हिटी वाढल्यास, भारतातील ईशान्येकडील राज्ये जसे की आसाम आणि त्रिपुरा चट्टोग्राम बंदरात प्रवेश करू शकतील, असे बैठकीदरम्यान पंतप्रधान हसिना बोलत असल्याचे बांगलादेशच्या पंतप्रधानांचे प्रेस सचिव एहसानुल करीम यांनी सांगितले.

शेख हसीना यांच्याशी अर्ध्या तासाची बैठक

बांगलादेशच्या पंतप्रधानांनी नमूद केले की 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान बंद केलेले बांगलादेश आणि भारत यांच्यातील सीमापार मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. तेव्हा बांगलादेश हा पाकिस्तानचा पूर्व भाग होता. जयशंकर यांच्यासोबत पंतप्रधान हसिना यांच्या अर्ध्या तासाहून अधिक काळ झालेल्या बैठकीत अनेक द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली. जयशंकर यांनी नंतर त्यांचे बांगलादेशी समकक्ष एके अब्दुल मोमेन यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर संयुक्तपणे प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी एकमत झाले

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट केले की, "डॉ. मोमेन आणि डॉ. एस. जयशंकर यांनी बांगलादेश आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी बांगलादेश-भारत सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले, या बैठकीदरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा संकल्प केला, एकूण सामाजिक-आर्थिक विकासासाठी प्रादेशिक स्थिरतेवर भर दिला."

जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान हसिना यांच्याशी झालेल्या संभाषणात त्यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या सोयीनुसार भारत भेटीचे निमंत्रण दिले. मी पंतप्रधान हसिना यांना सांगितले की आम्ही त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या भारत भेटीसाठी उत्सुक आहोत. त्याचबरोबर बांगलादेशच्या पंतप्रधानांसोबतच्या भेटीत द्विपक्षीय संबंधांसोबतच तर्कशुद्ध आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचेही जयशंकर यांनी माध्यमांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

Vande Mataram 150th Anniversary: ‘विकसित भारत 2047 ’च्या स्वप्नासाठी जगा', CM सावंतांचे तरुणांना आवाहन; ‘वंदे मातरम्’ स्मरणोत्सव साजरा

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT