Covid-19 चौथ्या लाटेचा धोका! भारतात सलग दुसऱ्या दिवशी 3000 हून अधिक पॉझीटिव्ह रूग्ण

देशात करोडो जनतेने कोविड लसींचे दोन्ही डोस घेतले असून महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील लोकांना कोरोनाचा विसर पडलाय
Covid-19
Covid-19Dainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: गेल्या 24 तासांत भारतात कोरोना विषाणू संसर्गाची 3,377 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. हा सलग दुसरा दिवस आहे जेव्हा कोरोना विषाणू संसर्गाची 3000 हून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यापूर्वी 28 एप्रिल रोजी देशात कोरोना संसर्गाचे 3,303 नवीन रुग्ण आढळले होते. गेल्या 24 तासांत 2496 लोक कोरोना संसर्गापासून मुक्त झाले आहेत, तर 60 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने सांगितले की, गुरुवारी भारतात 4,73,635 कोविड नमुना चाचण्या करण्यात आल्या, आतापर्यंत भारतात एकूण 83,69,45,383 नमुना चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात कोविडची अशी परिस्थिती असताना जूनमध्ये कोरोनाची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 17,801 झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, या विषाणूमुळे देशात आतापर्यंत 5,23,753 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोना लसीचे 22,80,743 डोस देण्यात आले आहेत. तर देशात आतापर्यंत कोरोना लसीच्या डोसची संख्या 1,88,65,46,894 वर पोहोचली आहे. राजधानी दिल्लीतून कोरोना संसर्गाची सर्वाधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. सलग 7 व्या दिवशी कोविड-19 चे 1000 हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. बुधवारी दिल्लीत 32,248 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.

Covid-19
दिल्लीच्या शाहीन बागेत NCB ची मोठी कारवाई; 50 किलो हेरॉईन व 30 लाख रुपये केले जप्त

देशात करोडो जनतेने कोविड लसींचे दोन्ही डोस घेतले असून महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील लोकांना कोरोनाचा विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात साडेपाच लाख नागरिकांना कोविड लसीकरण केले नाही.कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. दुसरा डोस घेण्यातही यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांची उदासिनता दिसून येत आहे.

गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोना संसर्गाचे 1490 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 1070 रुग्ण बरे झाले आहेत. त्याचवेळी, दिल्लीत गेल्या 24 तासात कोरोना संसर्गामुळे 2 मृत्यूची नोंद झाली आहे. राष्ट्रीय राजधानीत कोरोनाची सक्रिय प्रकरणे आता 5,250 झाली आहेत. दिल्ली सरकारच्या आरोग्य बुलेटिननुसार, राज्यात आतापर्यंत 18,79,948 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

Covid-19
दिल्लीत उष्णतेची लाट, शिमल्यात मुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामानाचा मूड

त्याच वेळी, मृतांची संख्या 26,172 वर पोहोचली आहे. हरियाणात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणू संसर्गाचे 580 नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी 473 संक्रमित फक्त गुरुग्राममधील आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून, दिल्ली सीमेला लागून असलेल्या गुरुग्राम आणि फरिदाबादमध्ये संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नोएडा आणि गाझियाबादमध्येही कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com