Accident News Dainik Gomantak
देश

Accident News: चालकाचे नियंत्रण सुटले अन् क्षणात खेळ खल्लास! देव दर्शनाहून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात चिमुकल्यासह 6 जणांचा मृत्यू

Baghpat Road Accident: उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अपघाताची घटना समोर आली.

Manish Jadhav

Baghpat Road Accident: उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अपघाताची घटना समोर आली. ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेस-वेवर भाविकांनी भरलेली एक पिकअप अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकल्याने मोठा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की गाडी महामार्गावर पलटली, ज्यामध्ये एका चिमुकल्यासह सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर सुमारे तीस भाविक गंभीर जखमी झाले. हे सर्व भाविक राजस्थान येथून उत्तर प्रदेशातील बदायूंच्या दिशेने जात असताना खेकडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडागाव कटजवळ रात्री साडेबाराच्या सुमारास ही भयानक दुर्घटना घडली.

अपघाताची माहिती मिळताच डायल-112 सह पोलीस यंत्रणा, रुग्णवाहिका आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या भाविकांना बाहेर काढून तात्काळ सीएचसी खेकडा, सीएचसी बागपत आणि जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी अनेक भाविकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने 14 गंभीर जखमींना मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सहा जणांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आणि प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याचा आढावा घेतला. अपघातामुळे एक्सप्रेस-वेवर झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी सुरळीत केली असून मृतदेहांची ओळख पटवून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. प्राथमिक तपासानुसार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात (Accident) झाल्याचे समजते, मात्र पोलीस अपघाताच्या अचूक कारणांचा शोध घेत आहेत.

बागपत पोलिसांनी मृत आणि जखमी भाविकांच्या नातेवाईकांना तात्काळ माहिती मिळण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक (94544173383) जारी केला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि भाविकांच्या गावांवर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातील संभल येथेही ऑटो आणि डंपरच्या धडकेत दोन बालकांसह पाच जणांना जीव गमवावा लागला होता, आणि त्यानंतर लगेच घडलेल्या या भीषण अपघाताने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT