Bageshwar Dham:  Dainik Gomantak
देश

Bageshwar Dham: बागेश्वर धामला भक्तांनी जायचे की नाही? सातत्याने सापडत आहेत भक्तांचे मृतदेह, यापूर्वी 21 जण बेपत्ता

Bageshwar Dham: दर्शनासाठी आलेल्या एका मध्यमवयीन व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.

Ashutosh Masgaunde

Bageshwar Dham:

मध्य प्रदेशातील छतरपूर येथील बागेश्वर धाम येथून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बागेश्वर धाम येथे अर्जी लावायला आलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. गेल्या महिनाभरात बागेश्वर धाम येथे एकूण 4 मृतदेह सापडले आहेत.

यासह जानेवारी महिन्यापासून बागेश्वर धाम परिसरातून जवळपास 21 जण बेपत्ता झाले आहेत. त्यातील 9 जणांना शोधण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

मंगळवारी रात्री उशिरा ज्या व्यक्तीचा मृतदेह सापडला, तो बागेश्वर धाम येथे दर्शनासाठी आला होता, असे सांगण्यात येत आहे. महिनाभरात 4 मृतदेह मिळाल्याने पोलिसही चक्रावले आहेत. त्याचबरोबर बागेश्वर धाममध्ये येणाऱ्या भाविकांची चिंता वाढणेही स्वाभाविक आहे.

बागेश्वर धामच्या बायपास रोडवर एका मध्यमवयीन व्यक्तीचा मृतदेह आढळल्ळूयाची माहिती घाईघाईत स्थानिक पोलिसांना देण्यात आली. रात्री उशिरा मृतदेह सापडल्याने स्थानिक पोलिसांमध्येही भीती होती. घटनास्थळी दाखल झालेल्या स्थानिक बामिठा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

ज्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे तो मूळचा मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 1 महिन्यात बागेश्वर धाममध्ये चौथा मृतदेह सापडला आहे.

यापूर्वी १७ जून रोजी गाडा गावात असलेल्या बागेश्वर धाममध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावर कपडे नव्हते. त्यावेळी त्याची ओळखही पटू शकली नाही. यापूर्वी 11 जून 2023 रोजीही बागेश्वर धाममध्ये एक मृतदेह सापडला होता. दिल्लीहून आलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह बागेश्वर धामजवळील गावात आढळून आला.

बागेश्वर धाममध्ये सातत्याने मृतदेह सापडत असल्याने पोलिसही बुचकळ्यात पडले आहेत. सातत्याने लोकांचे मृतदेह का का सापडत आहेत, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बागेश्वर धामच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण करणाऱ्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. मंगळवारी मृतदेह सापडण्यापूर्वीच एक मुस्लीम तरुण बागेश्वर धाम आवारात चाकू घेऊन घुसला होता. तो निर्भयपणे प्रदक्षिणा मार्गावर फिरत होता. यामुळे तेथे उपस्थित भाविक थक्क झाले. त्याची माहिती तातडीने स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला ताब्यात घेतले. बागेश्वर धाममध्ये भाविक मोठ्या संख्येने येतात, अशा स्थितीत सुरक्षेत एवढा मोठा हलगर्जीपणा कसा?

चार महिन्यांत 21 जण बेपत्ता

बमिठा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी जानेवारीपासून बागेश्वर धाम येथून 21 जण बेपत्ता झाले आहेत. यातील नऊ जण पोलिसांना आणि कुटुंबीयांना सापडले, मात्र अद्यापपर्यंत 12 जणांचा शोध लागलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT