Azam Khan Dainik Gomantak
देश

Rampur Hate Speech Case: रामपूर हेट स्पीच प्रकरणी आझम खान यांना मोठा झटका, कोर्टाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा

Azam Khan Latest News: रामपूर हेट स्पीच प्रकरणी आझम खान यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Manish Jadhav

Azam Khan Latest News: रामपूर हेट स्पीच प्रकरणी आझम खान यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आझम खान यांच्यावर 171 जी आणि कलम 505 (1) बी आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 125 अंतर्गत कारवाई करण्यात आली.

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी सपा नेते आझम खान यांच्याविरोधात रामपूरमधील शहजाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आझम खान यांच्यावर लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप होता. 2019 मध्ये हा गुन्हा दाखल झाला होता. आझम खान तेव्हा सपा-बसपा युतीचे लोकसभेचे उमेदवार होते.

आझम खान यांना 2 वर्षांची शिक्षा

एमपी-एमएलए न्यायालयाने आझम खान यांना शिक्षा सुनावली आहे. याआधी शुक्रवारीच आझम खान यांची Y-श्रेणी सुरक्षा यूपी सरकारने काढून घेतली होती. आझम खान हे समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. आझम खान रामपूर नगरमधून दहा वेळा आमदार झाले आहेत.

आता सुरक्षा काढून घेतल्यानंतर आझम खान यांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही हटवण्यात आले.

आझम यांची सुरक्षाही हटवण्यात आली

रामपूरचे एएसपी डॉ संसार सिंह यांनी सांगितले की, आझम खान यांना 'वाय' श्रेणीच्या सुरक्षेअंतर्गत 3 सशस्त्र पोलिस (Police) देण्यात आले आहेत. त्यांच्या निवासस्थानी सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले होते. आझम खान यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सर्व पोलिसांना रामपूर पोलिस लाईनमध्ये परत बोलावण्यात आले आहे.

आझम खान 10 वेळा आमदार झाले आहेत

तसेच, 2022 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) दिग्गज सपा नेते आझम खान यांनी 10 व्यांदा रामपूर नगर मतदारसंघातून विजय मिळवला होता. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आझम खान यांनी रामपूर लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला.

त्यानंतर, ऑक्टोबर 2022 मध्ये, रामपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने आझम खान यांना प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्यांना 3 वर्षांचा कारावास आणि 6,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यानंतर आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT