Ram Lalla Dainik Gomantak
देश

Ram Mandir: ''रामलल्ला रोज एक तास घेणार विश्रांती, सलग 18 तासामुळे येतो थकवा ''; मुख्य पुजाऱ्याच्या विनंतीवरुन राम मंदिर राहणार बंद!

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांच्या विनंतीवरुन रामलल्लाला आता दुपारी एक तासाची विश्रांती दिली जाणार आहे.

Manish Jadhav

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांच्या विनंतीवरुन रामलल्लाला आता दुपारी एक तासाची विश्रांती दिली जाणार आहे. रामलल्लाला शुक्रवारपासून एक तासाची विश्रांती देण्यात येत आहे. याआधी रामलल्लाला दुपारी आराम मिळत नव्हता.

राम मंदिराच्या (Ram Mandir) पुजाऱ्याचा असा युक्तिवाद आहे की, प्रभू राम हे लल्ला आहे, म्हणजेच एक बालक. त्यांच्यावर जास्त जोर दिला जाऊ शकत नाही. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भाविकांची वाढती गर्दी पाहता मंदिर ट्रस्टने दर्शनाची वेळ सकाळी 6 ते रात्री 10 अशी वाढवली आहे. 23 जानेवारीपासून भगवान रामाला विधीसाठी पहाटे 4 वाजता उठवले जायचे, ज्याला तब्बल दोन तास लागायचे. त्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासून दर्शन सुरु होऊन रात्री 10 वाजेपर्यंत चालते. यानंतर, संध्याकाळच्या विधीला देखील दोन तास लागतात.

आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, “रामलल्ला हे पाच वर्षांचे मूल आहे आणि ते 18 तास सतत इतका ताण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे बालदेवतेला थोडी विश्रांती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिराचे दरवाजे दुपारी 12:30 ते 1:30 पर्यंत बंद राहतील, जेणेकरुन रामलल्ला थोडी विश्रांती घेऊ शकतील.''

दुसरीकडे, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी दर्शनाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी होती. ज्यात दुपारी दीड ते साडेतीन या दोन तासांच्या विश्रांतीचाही समावेश होता. अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एका समारंभात झाले. या शुभ सोहळ्यात राजकारणी, क्रिकेटपटू, उद्योगपती, अध्यात्मिक नेते आदींसह हजारो व्हीव्हीआयपी सहभागी झाले होते.

23 जानेवारी रोजी मंदिर रामभक्तांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिराच्या उद्घाटनापासून, दहा लाखांहून अधिक भाविक आणि यात्रेकरुंनी प्रार्थना करण्यासाठी आणि प्रभू रामलल्लांचे आशीर्वाद घेण्यासाठी पवित्र स्थळाला भेट दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT