Muslim Dharmguru DR Imam Umer Ahmed Ilyasi: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल एका मुस्लिम धर्मगुरुच्या नावाने फतवा काढण्यात आला आहे. हे धर्मगुरु म्हणजे ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. इमाम उमर अहमद इलियासी. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभात डॉ. इलियासी सहभागी झाले होते. रविवारी हा फतवा जारी करण्यात आल्याचे इमाम यांनी सांगितले. मात्र राम मंदिर कार्यक्रमापासून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. यामध्ये जीवे मारण्याची धमकी असून कुटुंबाविरोधात अपशब्दही वापरले जात आहेत.
डॉ. इमाम उमर अहमद इलियासी यांनी सांगितले की, अयोध्येतून दिलेल्या संदेशात मी म्हटले होते की, ''आमची उपासनेची पद्धत वेगळी असू शकते. आपले धर्म भिन्न असू शकतात, परंतु आपण सर्वजण भारतात राहतो आणि आपण सर्व भारतीय आहोत. आपण सर्वजण मिळून भारताला मजबूत करुया... मात्र, माझा हा मेसेज व्हायरल होताच सर्वांना कळले की, मी राम मंदिराच्या सोहळ्याला उपस्थित राहिलो होतो. आता रविवारी माझ्याविरोधात हा फतवा काढण्यात आला आहे.'' डॉ. इलियासी यांनी पुढे सांगितले की, ''22 जानेवारीच्या संध्याकाळपासून माझ्या नंबरवर वेगवेगळ्या ठिकाणांहून धमक्या येऊ लागल्या आहेत. मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे.''
डॉ. इलियासी यांनी पुढे सांगितले की, ''मला धमक्या देणारे काही फोन कॉल्स मी रेकॉर्ड केले आहेत. ज्यांचे देशावर प्रेम आहे ते माझ्यावर प्रेम करतील आणि मला साथ देतील. मी राम मंदिर सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यामुळे काही लोक माझा द्वेष करत असतील तर अशा लोकांनी पाकिस्तानात जावे.'' इलियासी पुढे असेही म्हणाले की, ''मी प्रेम आणि बंधुतेचा संदेश दिला आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी माफी मागणार नाही आणि राजीनामाही देणार नाही. धमक्या देणाऱ्यांना हवं ते करु द्या.''
डॉ. इलियासी पुढे म्हणाले की, ''मुख्य इमाम असल्याने मला राम मंदिर ट्रस्टकडून निमंत्रण आले होते.'' एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना इलियासी म्हणाले की, ''दोन दिवस मी याबद्दल विचार केला कारण हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय होता. परंतु शेवटी परस्पर सौहार्द, देश आणि राष्ट्रहितासाठी मी अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला. डॉ. इलियासी यांनी शेवटी सांगितले की, ''तिथे माझे अतिशय प्रेमाने स्वागत करण्यात आले. ऋषी-मुनींनीही माझा खूप आदर केला. यानंतर मी तिथून प्रेमाचा संदेशही दिला.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.