Ayodhya Ram Mandir Dainik Gomantak
देश

Ayodhya Ram Mandir: 14 लाख दिवे वापरून साकारली प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा! Video पाहून व्हाल थक्क

राम मंदिराच्या 'प्राण प्रतिष्ठा' समारंभाच्या आधी, साकेत महाविद्यालयात मोझॅक कलाकार अनिल कुमार यांनी 14 लाख दिव्याचा वापर करून प्रभू रामाची भव्य प्रतिमा साकारली आहे.

Puja Bonkile

Ayodhya Ram Mandir:  अयोध्येत 22 जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीचा भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे. यानिमित्त्याने साकेत महाविद्यालयात मोझॅक कलाकार अनिल कुमार यांनी 14 लाख दिव्याचा वापर करून प्रभू रामाची भव्य प्रतिमा साकारली आहे. याचा व्हिडिओ एक्सवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये भक्त प्रभू रामाच्या प्रतिमेवर भक्त दिवे लावताना दिसत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अयोध्या सुंदर पद्धतीने सजली आहे.

या भव्य सोहळ्याच्या आधी उत्तर प्रदेश पोलिसांनी 10,000 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. राम मंदिरातील भव्य कार्यक्रमाच्या दिवशी अयोध्येत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ड्रोन देखील तैनात केले जाणार आहे.

आसपासच्या कोणत्याही अनधिकृत ड्रोनवर नियंत्रण ठेवण्यासाठी अँटी ड्रोन यंत्रणाही बसवण्यात आली आहे, असे एसपी सुरक्षा गौरव वांसवाल यांनी सांगितले आहे.

डीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की, अयोध्येत 10,000 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

याशिवाय पोलिस दलाच्या मदतीसाठी आधुनिक तांत्रिक उपकरणेही तैनात करण्यात आली आहेत. या यंत्रणेच्या मदतीने कोणत्याही अनधिकृत ड्रोनवर नियंत्रण मिळवणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंदिरारडे जाणारे रस्ते स्वच्छ करून अतिक्रमणमुक्त केले जात असल्याचे डीजी म्हणाले. 17 किंवा 18 जानेवारीपासून अवजड वाहने वळवली जातील. यासाठी वेळोवेळी वाहतूक सूचना जारी केल्या जातील.

रेल्वे आणि बस स्थानकांवर अतिरिक्त फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे, कुमार म्हणाले की, तेथे सतत पोलिसांची उपस्थिती असेल.

अयोध्या आणि शेजारील जिल्ह्यातील लोकांच्या समन्वयाने हा कार्यक्रम ऐतिहासिक बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे डीजी म्हणाले.

"जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान यंत्रणा बसवली जात आहे आणि ती अयोध्येतील सुरक्षा व्यवस्थेचा एक प्रमुख भाग असेल," असे एसपी वांसवाल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT