Atique Ahmed  Dainik Gomantak
देश

Atique Ahmed Property: अतिकच्या करोडोंच्या काळ्या पैशाचा वारस कोण? मालमत्ता कोणाला मिळणार

Atique Ahmed Murder Case: दरम्यान, अतिकची कोट्यवधींची मालमत्ता कोणाला मिळणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Manish Jadhav

Atique Ahmed Property: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजबाहेर शनिवारी रात्री झालेल्या माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. दोघांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आले आहेत. रिपोर्टमध्ये अतिकला नऊ गोळ्या लागल्याचे आढळले, त्यापैकी एक गोळी त्याच्या डोक्याला लागली.

दरम्यान, अतिकची कोट्यवधींची मालमत्ता कोणाला मिळणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या काळात त्याने अमाप संपत्ती कमावली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतिक 1200 कोटींच्या मालमत्तेचा मालक होता. मात्र, हा आकडा यापेक्षा खूप जास्त असू शकतो. यामध्ये अनेक बेनामी आणि बेकायदेशीर मालमत्तांचाही समावेश आहे.

असद आणि गुलामच्या एन्काउंटरपूर्वी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अतिक आणि त्याच्या अनेक जवळच्या मित्रांच्या घरांवर छापे टाकले होते.

दुसरीकडे, या छाप्यात तपास यंत्रणेने 15 ठिकाणांहून बेनामी आणि बेकायदेशीर संपत्तीची 100 हून अधिक कागदपत्रे जप्त केली आहेत.

याशिवाय, प्रयागराज आणि लखनऊच्या (Lucknow) पॉश भागातही त्याची मालमत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. हे एकतर अतिक किंवा कुटुंबीयांच्या नावावर आहे.

कोण असेल दावेदार?

सध्या अतिकची पत्नी शाइस्ता परवीन फरार आहे. ती अतिकच्या अंत्यसंस्कारातही सहभागी झाली नव्हती. त्यांचा मुलगा असद हा चकमकीत मारला गेला आहे.

दोन मुले बालसुधारगृहात आहेत. बेकायदेशीर आणि बेनामी मालमत्तेची काळी गुपिते अतिक आणि अश्रफ यांच्याबरोबर गेली.

मात्र, निवडणूक प्रतिज्ञापत्र आणि आयकराच्या कागदपत्रांमध्ये अतिकने आपले उत्पन्न खूपच कमी असल्याचे जाहीर केले आहे.

तसेच, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात आतिकच्या कुटुंबीयांची अद्याप चौकशी केलेली नाही.

त्याने गरीब आणि असहाय लोकांच्या जमिनी त्यांना धाक दाखवून हडप केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. सध्या ईडी अतिकची पत्नी आणि इतर दोन मुलांची चौकशी करु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

SCROLL FOR NEXT