Atiq Ahmed Son Aban Ahmed Accident Dainik Gomantak
देश

Atiq Ahmed Son Death: भरधाव वेग अन् अचानक नियंत्रण सुटलं! गँगस्टर अतिक अहमदच्या मुलाच्या कार अपघाताचा व्हिडिओ व्हायरल; 6 दिवसांनंतर भयानक वास्तव आलं समोर

Atiq Ahmed Son Aban Ahmed Accident Video: गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा अबान अहमद याच्या कार अपघाताचा एक अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला.

Manish Jadhav

Atiq Ahmed Son Aban Ahmed Accident Video: गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा अबान अहमद याच्या कार अपघाताचा एक अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला. 6 ऑगस्ट रोजी झाशी येथे झालेल्या या भीषण कार अपघातात अबान आणि त्याचा मित्र सोनू या दोघांचा मृत्यू झाला. या थरारक अपघातानंतर तब्बल 6 दिवसांनी आज त्या कारमधील डॅशबोर्ड कॅमेऱ्याचे फुटेज समोर आले असून, सोशल मीडियावर ते व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अबान चालवत असलेली वेगवान एसयूव्ही कार झाशी जिल्ह्यातील हायवेवर अचानक नियंत्रण सुटल्याने डिवाइडरला धडकून उलटल्याचे स्पष्ट दिसत आहे.

कारच्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झालेल्या या व्हिडिओनुसार, अबानच्या भरधाव कारने सुरुवातीला एका कारला ओव्हरटेक केले आणि त्यानंतर पुढे जात असलेल्या एका ट्रकलाही ओव्हरटेक करुन कार पुढे निघाली. मात्र, ट्रकला ओव्हरटेक केल्यानंतर अचानक कार डाव्या बाजूला रस्त्याच्या खाली उतरली. यामुळे कारचा समतोल बिघडला आणि ती थेट हायवेच्या डिव्हायडर जाऊन जोरदार धडकली.

धडक इतकी भीषण होती की, कार हवेत उडाली आणि रस्त्यावरच उलट्या खात कोसळली. या भीषण अपघातात कारच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. हा भीषण अपघात 6 ऑगस्ट रोजी झाशीच्या पूंछ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हायवेवर झाला होता. अबान अहमद हा प्रयागराजहून झाशीकडे जात होता. झाशीच्या जेलमध्ये बंद असलेला त्याचा मोठा भाऊ अली अहमद याला भेटण्यासाठी तो निघाला होता, मात्र वाटेतच काळाने त्याच्यावर झडप घातली.

दरम्यान, या अपघातानंतर प्रयागराज येथे झालेल्या अबानच्या अंत्यविधीसाठी जेलमध्ये बंद असलेल्या उमर अहमद आणि अली अहमद या त्याच्या दोन्ही मोठ्या भावांना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने पॅरोल मंजूर केला. कडक पोलीस बंदोबस्तात थेट दफनभूमीवर आणले गेलेले दोन्ही भाऊ आपल्या लहान भावाच्या अंत्यविधीवेळी प्रचंड भावुक झाले. अबानला त्याचे वडील अतिक अहमद याच्या कबरीजवळच दफन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT