Election Commission of india Dainik Gomantak
देश

Assembly Election Dates: त्रिपुरा, मेघालय अन् नागालँडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा...!

Assemby Election: निवडणूक आयोगाने त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Assemby Election: निवडणूक आयोगाने त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला, मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर होणार आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेसोबतच तीनही राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली. नागालँड विधानसभेची मुदत 12 मार्च रोजी संपत आहे, तर मेघालय आणि त्रिपुरा (Tripura) विधानसभेची मुदत अनुक्रमे 15 आणि 22 मार्च रोजी संपत आहे. तीन राज्यांच्या विधानसभेत 60-60 जागा आहेत.

तसेच, या वर्षी प्रथमच ईशान्येतील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता आहे, तर नागालँडमध्ये नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीची सत्ता आहे. मेघालयात (Meghalaya) नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) ची सत्ता आहे. एनपीपी हा ईशान्येतील एकमेव पक्ष आहे, जो राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT