Assam News Dainik Gomantak
देश

Assam पोलिसांची मोठी कारवाई; मदरशात द्यायचा जिहादी प्रशिक्षणाचे धडे

Assam News: पोलिसांनी आसमच्या मदरशाच्या संचालकाला अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात असलेल्या मोरियाबादीमध्ये, आसाम पोलिसांनी आज पहाटे बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या मदरशावर प्रशासनासह बुलडोझर चालवला. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पोलिसांनी दंडाधिकार्‍यांच्या उपस्थितीत मदरसा जमीनदोस्त करण्यात आला.

आसाममधील (Assam) मोरीगाव जिल्ह्यातील मोरियाबारी या गावात गेल्या अनेक वर्षांपासून मदरसा सुरू होता. या मदरशात मुलांना जिहादचे शिक्षण दिले जात असल्याचा आरोप आहे. आसाममधील इतर कोणत्या भागात असे मदरसे चालवले जात आहेत, जिथे मुलांना जिहादी बनण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, याचाही तपास पोलिस करत आहेत.

* मदरशात जिहादी बनण्याचे प्रशिक्षण दिले जात होते

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मुस्तफा नावाचा एक व्यक्ती जो बांगलादेश अन्सुरला बांग्ला संघटनेशी संबंधित होता. तो मदरशात मुलांना जिहादी बनण्याचे प्रशिक्षण देत होता. हा गट दहशतवादी संघटना अल कायदाशी (Law) संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा मदरसा येथे सक्रिय होता. ज्यामध्ये भारताविरुद्ध (India) जिहादी कारवायांना बळ देण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. मात्र, याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी अधिक माहितीचा तपास सुरू केला आहे.

* पोलीस बँक तपशील तपासण्यात गुंतले

काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील अमीरोद्दीन अन्सारी नावाच्या व्यक्तीला अन्सार उल्लाह बांग्ला संघाशी संपर्क साधल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्या व्यक्तीसोबत अटक करण्यात आलेल्या मुस्तफाच्या आर्थिक व्यवहाराच्या नोंदी पोलिसांना सापडल्या आहेत. या दोघांमध्ये अनेकवेळा पैशाची (Money) देवाणघेवाण झाली आहे. पोलीस आता मुस्तफाच्या बँक तपशीलांचा शोध घेण्यामध्ये गुंतले आहेत.

* मदरशात संशयित व्यक्तीला आश्रय दिला

आणखी एक महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार, आरोपी मुस्तफाने 2019 मध्ये त्याच्या मदरशात दुसऱ्या देशातील एका संशयित व्यक्तीला आश्रय दिला होता. मुस्तफाने ज्या व्यक्तीला त्याच्या मदरशात आश्रय दिला होता. तो कोण होता, याची माहितीही पोलिसांनी गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

अटक करण्यात आलेला व्यक्ती अनेक देशविरोधी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तफाने 2018 मध्ये मदरसा सुरू केला होता. त्याने यापूर्वी उत्तर प्रदेश आणि भोपाळमध्ये प्रशिक्षण घेतले होते आणि जिहादचा अभ्यास केला होता.

मोरीगावच्या एसपी अर्पणा नटराजन यांनी सांगितले की, आसाम आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार हा मदरसा पाडण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, पोलिसांना आरोपीच्या मोबाईलमध्ये (Mobile) अनेक संशयास्पद व्हिडिओ (Video) आणि कागदपत्रांसह अनेक आक्षेपार्ह पुस्तके सापडली आहेत, ज्याचा आम्ही तपास करत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT