शांतता भंग करण्यासाठी दहशतवाद्यांची तयारी, IB ने Delhi पोलिसांना केले सतर्क

Terrorists Attack: देश यंदा स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे.
Terrorists
TerroristsDainik Gomantak
Published on
Updated on

Terrorists Attack: देश यंदा स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. केंद्र सरकारने 'आझादी के अमृत महोत्सव' नावाचा 15 दिवसांचा कार्यक्रम सुरु केला आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक घरात तिरंग्यासह इतर कार्यक्रम प्रस्तावित आहेत. दुसरीकडे मात्र, दहशतवादी संघटना सतर्क झाल्या आहेत. घातपातासारख्या कारवाया दहशतवाद्यांकडून होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. याबद्दल गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना सतर्कही केले आहे. त्याचबरोबर त्यांनी काही निर्देशही दिल्ली पोलिसांना दिले आहेत.

दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी आयबीने दिल्ली पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. इंटेलिजन्स ब्युरोने आपल्या 10 पानांच्या अहवालात लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba), जैश यासारख्या दहशतवादी (Terrorists) संघटना कटाची तयारी करत आहेत. विशेष म्हणजे, त्यांना लॉजिस्टिक मदत देऊन आयएसआयला स्फोट घडवायचा आहे, असे बोलले जात आहे. अनेक राजकारणी, मोठ्या संस्थांना टार्गेट केले जाऊ शकते.

Terrorists
UP: माफिया ब्रिजेश सिंगला मोठा दिलासा, मुख्तार अन्सारीच्या ताफ्यावर हल्ला केल्याप्रकरणी जामीन मंजूर

दुसरीकडे, IB च्या या अलर्टमध्ये जपानचे (Japan) माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर जुलै महिन्यात झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख आहे. 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमास्थळी कठोर नियम लागू करण्यास दिल्ली पोलिसांना सांगितले आहे. उदयपूर आणि अमरावतीमधील घटनेचा संदर्भ देत गुप्तचर यंत्रणांनी सांगितले की, 'कट्टरपंथी गट आणि गर्दीच्या ठिकाणी त्यांच्याकडून होणाऱ्या कारवायांवर कडक नजर ठेवली पाहिजे.'

Terrorists
माफिया मुख्तार अन्सारीला तुरुंगात आंबे देणं पडलं महागात, डेप्युटी जेलरसह 5 कर्मचारी निलंबित

तसेच, लष्कर-ए-तैयबा (Shkar-e-Taiba) आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटना यूएव्ही आणि पॅरा ग्लायडरचाही वापर करु शकतात, असे संस्थेने म्हटले आहे. त्यामुळे सीमेवर बीएसएफला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com